राष्ट्रीय सिनेमा दिन : स्वस्तात सिनेमा पाहण्याची मुदत काही मल्टिप्लेक्सने वाढविली!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात नुकताच राष्ट्रीय चित्रपट दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. अवघ्या ७५ रूपयात चित्रपट पाहायला मिळाल्याने चित्रपटगृहे हाऊसफुल्ल झाली. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून काही मल्टीप्लेक्सनी ही ऑफर वाढविली आहे. त्यामुळे काही मल्टीप्लेक्समध्ये येत्या २६ ते २९ सप्टेंबरपर्यंत तिकिटांचे दर कमी ठेवण्याची ही ऑफर सुरू राहणार आहे.National Cinema Day: Some multiplexes have extended the deadline for watching movies for cheap!!

गेली दोन वर्षे कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन असल्याने सर्व उद्योग ठप्प होते. मनोरंजन विश्वाला देखील मोठा फटका बसला होता. या काळात चित्रपट प्रदर्शित देखील करण्यात आले नव्हते. आता सुदैवाने कोरोना कमी होत असल्याने पुन्हा सर्व उद्योग पूर्वपदावर येत आहेत. अशातच या ऑफरमुळे का असेना झालेली गर्दी चित्रपटासाठी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीकरता आनंददायी होती.७५ रुपयांच्या तिकीटात बघा चित्रपट

नॅशनल सिनेमा डे निमित्ताने देशात पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज आणि सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए २, मूवीटाइम, वेव, एम२के आणि डेलाइटसारख्या चित्रपटगृहांसह देशभरात सुमारे ४ हजार स्क्रिन्सवर या सर्व सिनेमागृहांची तिकीटे ७५ रुपयांनी विकली गेली. तर अजूनही ७५ रुपयांची तिकीट ऑफर IMAX, 4DX आणि २९ सप्टेंबरपर्यंत थिएटरमध्ये येणाऱ्या सर्व सिनेमा आणि चित्रपटांवर लागू करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये लक्झरी व्हेरिएंट समाविष्ट नसले तरी सवलतीच्या दरात तिकिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

National Cinema Day: Some multiplexes have extended the deadline for watching movies for cheap!!

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय