मुख्यमंत्र्यांच्या वडलांना अटकेचे नाटकच, नंदकुमार बघेल यांना पोलीस ठाण्यात शाही वागणूक


विशेष प्रतिनिधी

रायपूर: कायद्यासमोर सर्व जण समान असल्याचा मानभावीपणा करत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वडलांना अटक करण्याचे धाडस दाखविले खरे पण ही अटक म्हणजे नाटकच असल्याचे समोर आले आहे. अटकेनंतर नंदकुमार बघेल हे वातानुकुलीत खोलीत दुपारचे जेवण करत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. Nandkumar Baghel was treated like a royal at the police station

ब्राम्हण समाज हा विदेशी असल्याचे म्हणत नंदकुमार बघेल यांनी अपमानास्पद टिप्पणी केली होती. दोन समाजांत तेढ पसरविल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्या वडीलांचे वक्तव्य योग्य नाही. त्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडला असून मलाही त्याचा त्रास झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक होईल का या प्रश्नावर ते म्हणाले होते की मुख्यमंत्र्याचे 86 वर्षांचे असले तरी कोणीही कायद्याच्या वर नाही. कायद्यानुसार कारवाई केली जाईल. आपले वडिलांसोबत वैचारिक मतभेद असल्याचे सांगून मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले होते आमचे राजकीय विचार वेगवेगळे आहेत. मुलगा म्हणून त्यांचा आदर करतो, पण मुख्यमंत्री म्हणून, सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या अशा चुकांसाठी मी त्यांना क्षमा करू शकत नाही. त्याप्रमाणे नंदकुमार बघेल यांना अटकही करण्यात आली.

\मात्र, ही अटक म्हणजे ब्राम्हण समाजाची व्होटबॅँक टिकविण्यासाठीचे नाटकच होते असे स्पष्ट झाले आहे. नंदकुमार बघेल यांचे पोलीस ठाण्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये वातानुकुलीत खोलीत बसून ते जेवण करत असल्याचे दिसत आहे. या शाही वागणुकीचा सोशल मीडियावर निषेध केला जात आहे.

Nandkumar Baghel was treated like a royal at the police station

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती