द काश्मीर फाईल्स सिनेमला प्रोपोगांडा म्हणणाऱ्या नदाव लॅपीडला झाली उपरती; मागितली माफी


वृत्तसंस्था

गोवा : 1990 च्या दशकातले काश्मीर मधले हिंदूंचे शिरकाण झाल्याचे सत्य दाखविणारा सिनेमा द काश्मीर फाईल्स याला प्रपोगंडा आणि व्हल्गर फिल्म असे संबोधणाऱ्या नदाव लॅपीड याला अखेर उपरती झाली आहे. who called The Kashmir Files movie as propaganda, was criticized by Lapid Nadav

काश्मीरमधील हिंसाचार पीडित लोकांचा उपमर्द करण्याची माझी इच्छा नव्हती. माझ्या आधीच्या वक्तव्यातून तसा अर्थ काढला गेला असेल तर मी माफी मागतो, असे वक्तव्य नदाव लॅपीड यांनी केले आहे.

गोव्यातील इफ्फी चित्रपट महोत्सवात मुख्य परीक्षक म्हणून नदावला लॅपीड या इजरायली दिग्दर्शकाने द काश्मीर फाईल्स सिनेमाबद्दल तो सिनेमा प्रपोगंडा आणि व्हल्गर असल्याचे उद्गार काढले होते. भारत आणि इजरायल यांचे विशिष्ट राजनैतिक आणि सामाजिक संबंध लक्षात घेता नदाव लॅपीड यांच्या वक्तव्याचे दोन्ही देशात तीव्र पडसाद उमटले.इजरायली राजदूतांनी भारताची माफी मागितली. नदाव लॅपीड याने सुरुवातीला आपली आडेल भूमिका कायम ठेवली पण भारतात होत असलेला तीव्र विरोध आणि काश्मीर फाईल्स सिनेमातले सत्य यामुळे अखेर उपरती होऊन त्याने माफी मागितली आहे.

नदाव लॅपीड हा इजरायल मधला डाव्या विचारसरणीचा सिनेमा दिग्दर्शक मानला जातो. त्याच्या वेगवेगळ्या सिनेमांना वेगवेगळी आंतरराष्ट्रीय पातळीवरची अवार्ड्स मिळाली आहेत. “सीनोनिमस” या सिनेमाला देखील बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये अवार्ड मिळाले आहे.

आमिर खानने बनविलेल्या लालसिंग चढ्ढा सारखाच सैनिकाच्या जीवनावर आधारित “सीनोनिमस” हा सिनेमा आहे. इजरायल मध्ये सैनिकी शिक्षण आणि सेवा अनिवार्य आहे. पण एक सैनिक सैन्यातून निघून जातो किंबहुना आपल्या इजराइल राष्ट्रीयत्वापासून तो पळून जातो या कथेवर आधारित सिनेमे हा सिनेमा आहे.

who called The Kashmir Files movie as propaganda, was criticized by Lapid Nadav

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण