पेगॅससच्या न्यायालयीन चौकशीसाठी हिंदुचे माजी संपादक एन. राम यांची याचिका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – पेगॅसस हेरगिरीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी ‘द हिंदू’ या दैनिकाचे माजी मुख्य संपादक एन. राम आणि ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम’चे अध्यक्ष शशी कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. N. Ram apply in Court

या हेरगिरी प्रकरणाची चौकशी विद्यमान अथवा निवृत्त न्यायाधीशांकडून व्हावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.पेगॅसस स्पायवेअरचे निर्माते इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’कडून याच्या वापरासाठी सरकारने किंवा सरकारशी संबंधित संस्थांनी परवाना घेतला होता का,याचा खुलासा करण्याचा आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावा, अशी मागणीही याचिकेत केली आहे. तसेच भारतीय नागरिकांवर पाळत ठेवण्यानसाठी याचा वापर केला का हे तपासावे, असेही या म्हटले आहे.

N. Ram apply in Court