मुस्लिम लॉ पर्सनल बोर्डाचा तालिबानला पाठिंबा तर समाजवादी पक्षाच्या खासदाराकडून गुणगान


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात बंदुकीच्या बळावर सत्ता काबीज करणाऱ्या कट्टरपंथी तालिबानी दहशतवाद्यांना अखिल भारतीय मुस्लिम लॉ पर्सनल बोर्ड या भारतीय मुस्लिम समाजाच्या सर्वोच्च संस्थेने पाठिंबा दिला आहे. ‘तालिबानला भारतीय मुसलमानांचा सलाम’, अशा शब्दांत लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी तालिबानचे स्वागत केले. Muslim personal law board backs Taliban

दरम्यान, तालिबानच्या रक्तपात हिंसाचाराची तुलना भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी करणारे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांच्यावर पोलिस ठाण्यात राष्ट्रद्रोहाच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.



मुस्लिम पर्सनल बोर्डाने तालिबानला केवळ पाठिंबाच दिलेला नाही तर त्यांचे गुणगानही केले आहे. दरम्यान, सपाचे संभलचे खासदार बर्क यांनी आता तालिबानला उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर संध्याकाळी बर्क यांनी खुलासा करून, आपल्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला गेला. आपला तालिबानशी काय संबंध, अशी कोलांटउडी मारली.

Muslim personal law board backs Taliban

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात