बेपत्ता मुलांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची “ऑपरेशन “री-युनाईट” मोहीम!!


प्रतिनिधी

मुंबई : नऊ वर्षांपासून बेपत्ता असलेली मुलगी सापडल्यानंतर मुंबई पोलिस अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या १८ वर्षांखालील मुलांचा शोध घेण्यासाठी “ऑपरेशन री- युनाईट” हा उपक्रम राबविणार आहेत. महिनाभर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी पोलीस नागरिकांची मदत घेणार आहेत. Mumbai Police’s “Operation “Re-Unite” campaign to find missing children!!

अंधेरी येथे राहणारी रेश्मा (काल्पनिक नाव) ही मुलगी नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाली त्या वेळी तिचे वय पाच वर्षे होते. बेपत्ता होऊन ९ वर्षे उलटल्यावर, ती कुठे आहे, काय करते, तिचे काय झाले असेल याबाबत काहीही माहिती नव्हती. ती परत येईल किंवा सापडेल ही आशा तिच्या कुटुंबांनी देखील सोडली होती.

“ऑपरेशन री- युनाईट”

मात्र डी. एन. नगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस अमलदाराच्या चिकाटीने रेश्मा ९ वर्षांनी अंधेरीतच सापडली. आपली मुलगी तब्बल ९ वर्षांनी सापडल्याचा आनंद रेश्माच्या कुटुंबीयांना झाला. याची दखल स्वतः पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी घेतली आणि त्यांनी अनेक वर्षांपासून हरवलेल्या अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी “ऑपरेशन री- युनाईट” हा उपक्रम प्रत्येक पोलीस ठाण्यात राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान एक महिना “ऑपरेशन री- युनायट” या उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील हरविलेल्या १८वयोगटाखालील मुलामुलींचा या उपक्रमादरम्यान शोध घेण्यात येणार आहे. महिनाभर चालणाऱ्या उपक्रमात पोलीस नागरिकांनाही सहभागी करून घेऊन त्यांची मदत घेणार आहेत.

पोलिसांचे आवाहन 

पोलिसांनी मुंबईकरांना विनंती केली आहे की, त्यांना आजूबाजूला अशी कोणतीही मुलं दिसली ज्यांच्यावर त्यांना बळजबरी करून विशिष्ट ठिकाणी वास्तव्य किंवा काम करत असल्याचा संशय आहे, असे कोणतेही मूल दिसल्यास १०० किंवा १०९८ वर कॉल करून कळवा, विशेषत: बस स्टँड, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट किंवा घरगुती कामात अशा मुलांना गुंतवलेले आढळल्यास त्वरीत स्थानिक पोलीस ठाणे अथवा मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून कळवा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. त्याचबरोबर www.trackthemissingchild.gov.in या संकेतस्थळावर हरवलेल्या मुलांची छायाचित्रे अपलोड केलेली आहेत, हरवलेल्या मुलांशी त्यांचा चेहरा जुळतोय का?, ते पाहण्याची विनंती मुंबई पोलिसांनी केली आहे.

Mumbai Police’s “Operation “Re-Unite” campaign to find missing children!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात