Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जिंकली 61 पदके, वाचा पदक विजेत्यांची संपूर्ण यादी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. यावेळी भारताने या खेळांमध्ये एकूण 61 पदके जिंकली, ज्यात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश आहे. या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने चौथे स्थान पटकावले. खेळाच्या शेवटच्या दिवशी भारताने चार सुवर्णांसह सहा पदके जिंकली. या चार सुवर्णांपैकी भारताने बॅडमिंटनमध्ये तीन सुवर्ण जिंकले.Commonwealth Games 2022 India wins 61 medals in Commonwealth Games, read complete list of medal winners



सुवर्णपदक विजेते

1. मीराबाई चानू- सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 49 किलो)
2. जेरेमी लालरिनुंगा- सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 67 किलो)
3. अचिंता शेउली – सुवर्णपदक (73 किलोग्रॅम वेटलिफ्टिंग)
4. महिला संघ- सुवर्णपदक (लॉन बॉल)
5. पुरुष संघ- सुवर्णपदक (टेबल टेनिस)
6. सुधीर- सुवर्ण पदक (पॅरा पॉवरलिफ्टिंग)
7. बजरंग पुनिया- सुवर्णपदक (कुस्ती 65 किलो)
8. साक्षी मलिक- सुवर्णपदक (कुस्ती 62 किलो)
9. दीपक पुनिया- सुवर्णपदक (कुस्ती ८६ किलो)
10. रवी कुमार दहिया- सुवर्णपदक (कुस्ती 57KG)
11. विनेश फोगट- सुवर्णपदक (कुस्ती 53 किलो)
12. नवीन कुमार- सुवर्णपदक (कुस्ती 74 किलो)
13. भाविना पटेल- सुवर्णपदक (पॅरा टेबल टेनिस)
14. नीतू घनघस – सुवर्णपदक बॉक्सिंग)
15. अमित पंघल- सुवर्णपदक (बॉक्सिंग)
16. अल्धॉस पॉल – सुवर्ण पदक (तिहेरी उडी)
17. निखत जरीन- सुवर्णपदक (बॉक्सिंग)
18. अचंत आणि श्रीजा अकुला- सुवर्णपदक (टेबल टेनिस)
19. पीव्ही सिंधू- सुवर्णपदक (बॅडमिंटन)
20. लक्ष्य सेन- सुवर्णपदक (बॅडमिंटन)
२१. सात्विक आणि चिराग- सुवर्णपदक (बॅडमिंटन)
22. अचंत शरथ कमल – सुवर्णपदक (टेबल टेनिस)

पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर

भारताने 11व्या दिवशी एकूण सहा पदके जिंकली, ज्यामुळे भारतीय संघाने न्यूझीलंडला मागे टाकून चौथे स्थान पटकावले.भारताच्या खात्यात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके आहेत. ऑस्ट्रेलियाने 67 सुवर्ण, 57 रौप्य आणि 54 कांस्य पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, यजमान इंग्लंडने 57 सुवर्ण पदकांसह दुसरे तर कॅनडाने 26 सुवर्ण पदकांसह तिसरे स्थान पटकावले. न्यूझीलंड 19 सुवर्णपदकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

रौप्य पदक विजेते

1. संकेत महादेव- रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)
2. बिंदियाराणी देवी – रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)
3. सुशीला देवी – रौप्य पदक (जुडो 48 किलो)
4. विकास ठाकूर – रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 96 किलो)
५. मिश्र संघ – रौप्य पदक (बॅडमिंटन)
६. तुलिका मान – रौप्य पदक (जुडो)
7. मुरली श्रीशंकर- रौप्य पदक (लांब उडी)
8. अंशू मलिक – रौप्य पदक (कुस्ती 57 किलो)
9. प्रियांका गोस्वामी – रौप्य पदक (10 किमी चालणे)
10. अविनाश साबळे – रौप्य पदक (स्टीपलचेस)
11. पुरुष संघ – रौप्य पदक (लॉन बॉल)
12. अब्दुल्ला अबुबकर- रौप्य पदक (तिहेरी उडी)
13. अचंत आणि जी. साथियान – रौप्य पदक (टेबल टेनिस)
14. सागर अहलावत- रौप्य पदक (बॉक्सिंग)
15. महिला संघ – रौप्य पदक (क्रिकेट)
16. भारतीय पुरुष संघ – रौप्य पदक (हॉकी)

कांस्यपदक विजेते

1. गुरुराजा- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 61 किलो)
2. विजय कुमार यादव – कांस्य पदक (जुडो 60 किलो)
3. हरजिंदर कौर- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 71KG)
4. लवप्रीत सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109 किलो)
5. सौरव घोषाल – कांस्य पदक (स्क्वॉश)
6. गुरदीप सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109+ केजी)
७. तेजस्वीन शंकर- कांस्य पदक (उंच उडी)
8. दिव्या काकरन – कांस्य पदक (कुस्ती 68 किलो)
९. मोहित ग्रेवाल – कांस्य पदक (कुस्ती १२५ किलो)
10. जास्मिन लॅम्बोरिया – कांस्य पदक (बॉक्सिंग)
11. पूजा गेहलोत – कांस्य पदक (कुस्ती 50 किलो)
12. पूजा सिहाग- कांस्य पदक (कुस्ती)
13. मोहम्मद हुसामुद्दीन – कांस्य पदक (बॉक्सिंग)
14. दीपक नेहरा- कांस्य पदक (97 KG कुस्ती)
15. सोनलबेन पटेल – कांस्य पदक (पॅरा टेबल टेनिस)
16. रोहित टोकस- कांस्य पदक (बॉक्सिंग)
17. भारतीय महिला संघ- कांस्य पदक (हॉकी)
18. संदीप कुमार – कांस्य पदक (10 किमी चालणे)
१९. अन्नू राणी – कांस्य पदक (भालाफेक)
20. सौरव आणि दीपिका पल्लीकल – कांस्य पदक (स्क्वॉश)
२१. किदाम्बी श्रीकांत – कांस्य पदक (बॅडमिंटन)
22. गायत्री आणि त्रिशा जॉली – कांस्य (बॅडमिंटन)
23. जी. साथियां – कांस्य पदक (टेबल टेनिस)

भारताने कुस्तीत मिळवली सर्वाधिक पदके

2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला कुस्तीत सर्वाधिक पदके मिळाली. भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमध्ये 12 पदके जिंकली, ज्यात सहा सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. यानंतर या यादीत वेटलिफ्टिंगचा क्रमांक येतो जिथे भारताच्या खात्यात 10 पदके आली. याशिवाय भारताला बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्णांसह 7 पदके मिळाली.

Commonwealth Games 2022 India wins 61 medals in Commonwealth Games, read complete list of medal winners

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात