वृत्तसंस्था
पाटणा : महाराष्ट्रात शिवसेनेत उभी फूट पडून झालेल्या सत्तांतरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मंगळवारी झाला. त्यामुळे भाजपने एकीकडे महाराष्ट्रात सत्तेतले स्थान पक्के केले असताना बिहारमध्ये मात्र भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती तोडत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत भाजपला बिहारच्या सत्तेमधून बाहेर काढले आहे.Kumar’s Coup Policy in Bihar; This may be the formula of the new government
बिहारमध्ये देखील आता सत्तांतर अटळ असून त्यासाठी मोर्चेबांधणी देखील सुरू झाली आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव अनुक्रमे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपदांचे सर्वसाधारण समान वाटप असा फॉर्म्युला असू शकतो.
– कुमार यांचा राजीनामा
नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यामुळे आता बिहारमधील भाजप-जेडीयू युतीचे सरकार बरखास्त झाले आहे. मंगळवारी नितीश कुमार यांनी जेडीयूच्या सर्व खासदार आणि आमदारांची आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. भाजपने जेडीयू नेत्यांना अपमानास्पद वागणूक दिली आणि पक्ष फोडण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुपारी त्यांनी बिहारचे राज्यपाल फगू चौहान यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
– असा असू शकतो सत्तेचा फॉर्म्युला
दरम्यान, बिहार विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 243 इतकी आहे. त्यामुळे बहुमतासाठी 122 सदस्यांचा आकडा गाठणं महत्वाचं आहे. सध्या बिहारमध्ये लालू प्रसाद यादव व त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांचा आरजेडी हा पक्ष सर्वात मोठा आहे. आरजेडीचे विधानसभेत एकूण 79 आमदार आहेत, त्याखालोखाल भाजपचे 77, जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19 व कम्युनिस्ट पक्षाचे 12 आमदार आहेत.
तसेच हिंदुस्तानी आवाम मोर्चा 4, एमआयएम 1 आणि इतर अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा आरजेडी आणि जेडीयूचं सरकार सत्तेत येण्याची चिन्हे असून, बुधवारीच नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे.
नितीश कुमारच मुख्यमंत्री पण…
राजीनाम्यानंतर नितीश कुमारांनी आरजेडीच्या तेजस्वी यादव यांची भेट घेतली असून सत्तास्थापनेबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार यादव हे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यास तयार असून उपमुख्यमंत्रीपद आणि गृहखाते यादव आपल्याकडे ठेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more