‘मोदीजी तुम्ही राष्ट्रपती कधी होणार?’ विखे पाटलांच्या चिमुकल्या नातीचा पीएम मोदींना भाबडा प्रश्न

MP Sujay Vikhe Patil Visits PM Modi With His Family in New Delhi

MP Sujay Vikhe Patil Visits PM Modi : पीएम मोदींचे लहान मुलांवरील प्रेम जगजाहीर आहे. वेळोवेळी आपल्या कृतीतून ते याची प्रचित देत असतात. महाराष्ट्रातील मातब्बर नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या नातीने पीएम मोदींची भेट घेऊन त्यांच्या दिलखुलास स्वभावाचा प्रत्यय घेतला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांची नात आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची कन्या अनिषा हिने पीएम मोदींची भेट घेण्याचा हट्ट धरला होता. दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार रामराजे शिंदे यांनी याबाबतचा किस्सा आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला आहे. MP Sujay Vikhe Patil Visits PM Modi With His Family in New Delhi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पीएम मोदींचे लहान मुलांवरील प्रेम जगजाहीर आहे. वेळोवेळी आपल्या कृतीतून ते याची प्रचित देत असतात. महाराष्ट्रातील मातब्बर नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या नातीने पीएम मोदींची भेट घेऊन त्यांच्या दिलखुलास स्वभावाचा प्रत्यय घेतला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांची नात आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची कन्या अनिषा हिने पीएम मोदींची भेट घेण्याचा हट्ट धरला होता. दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार रामराजे शिंदे यांनी याबाबतचा किस्सा आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला आहे.

चिमुकल्या अनिषाने दोन दिवस पंतप्रधान मोदींना भेटण्याचा हट्ट धरला. तिने बाबा सुजय विखे यांचा पिच्छ सोडला नाही. खासदार सुजय रोजच तिची समजूत घालत होते की, “बेटा ते प्राईम मिनिस्टर आहेत. ते कामात असतात.” पण तिचा हट्ट सुरूच होता. अखेर चिमुकल्या अनिषाने स्वत: पीएम मोदींना ईमेल केला. “मी अनिषा आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय,” असा बाबांच्या ईमेलवरून तिने थेट पंतप्रधानांना मेसेज पाठवला.

आणि आश्चर्य! थोड्याच वेळात मेलवर रिप्लाय आला. त्यात भेटण्याची वेळ नमूद होती. पंतप्रधान मोदींनी अनिषाचा हट्ट पुरवला. मग काय विखेपाटील सहकुटुंब मोदींना भेटायला गेले. यावेळी पंतप्रधान मोदींनी अनिषाला चॅाकलेट दिलं, मग दोघांच्या गप्पाही रंगल्या. चिमुकल्या अनिषानं प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुम्ही इथे बसता का? हे तुमचं ॲाफीस आहे का?

पंतप्रधान मोदी म्हणाले, हे माझं कायमचं ॲाफीस नाही. तू आली म्हणून तुझ्या भेटीला आलो. मी तर तुझ्याशी गप्पा मारायला आलोय.” पण इकडे मोदी उत्तर देताहेत तोवर अनिषानं पुन्हा प्रश्न विचारला, “तुम्ही गुजरातचे आहात का? मग तुम्ही राष्ट्रपती कधी होणार? यावर मोदीजी हसले. लगेच सुजय विखेंनी अनिषाला थांबवलं. मोदींनी ५ ते ७ मिनिटे अनिषाशी मन मोकळ्या गप्पा मारल्या. पंतप्रधानांच्या भेटीने चिमुकली अनिषा भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. विखे पाटील कुटुंबीयांनी यावेळी पंतप्रधान मोदींसोबत फोटोही काढले.

MP Sujay Vikhe Patil Visits PM Modi With His Family in New Delhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात