सर्वांत जास्त लसी महाराष्ट्राला दिल्या, तरी ठाकरे – पवार सरकारच्या तक्रारी संपेनात; जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भारती पवारांचा पहिला प्रहार


प्रतिनिधी

ठाणे – राज्याच्या आदिवासी भागात जनआशीर्वाद यात्रेवर निघालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज ठाकरे – पवार सरकारवर पहिला प्रहार केला. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वांत जास्त कोरोना प्रतिबंधक लसी दिल्या आहेत. त्याची अधिकृत आकडेवारी मी संसदेत सादर केलीय. तरी महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारच्या तक्रारी संपेचनात, असा घाव डॉ. भारती पवार यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या सुरूवातीलाच घातला. MOS health dr. bharati pawar targets thackeray – pawar govt over corona vaccine supply, as central govt provided highest vaccine doese for maharashtra

केंद्रातल्या मोदी सरकारच्या कामाची, महत्त्वाच्या निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी त्याचबरोबर राज्याच्या ठाकरे – पवार सरकारमधील त्रुटी दाखवण्यासाठी ही यात्रा आयोजित केली असल्याचे पवार यांनी सांगितले. कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून जास्त गर्दी न करता ही यात्रा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



डॉ. भारती पवार यांची ही जनआशीर्वाद यात्रा पालघर, मनोर, चारोटी, तालसरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडामार्गे जाणार आहे. केंद्रीय मंत्री म्हणून स्थानिक आरोग्यसुविधांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागे हे पाहणे आपली जबाबदारी असल्याचे भारती पवार यांनी पत्रकारांना सांगितले. त्या म्हणाल्या, की केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वात जास्त कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही, अशी तक्रार करीत आहे. त्यांच्या तक्रारी संपतच नाहीत. लस पुरवठ्याची अधिकृत आकडेवारी मी संसदेत सादर केली आहे. याची माहिती आता मी जनआशीर्वाद यात्रेत लोकांना देणार आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे – पवार सरकारचे राज्य सरकारचे वाभाडे काढले.
या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ग्रामीण भागातल्या लसीकरणाची माहिती घेणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे ही आपली जबाबदारी आहे. देशातील कोणीही व्यक्ती आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये हाच या जनआशीर्वाद यात्रेचा हेतू असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

MOS health dr. bharati pawar targets thackeray – pawar govt over corona vaccine supply, as central govt provided highest vaccine doese for maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात