रेल्वेमध्ये एक लाखांहून अधिक नव्या नोकऱ्या , १५ जानेवारीपर्यंत जाहीर केला जाणार निकाल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रेल्वे भरती मंडळाच्या म्हणजेच नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या लेव्हल-1 परीक्षेचा निकाल 15 जानेवारीपर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिलीय. रेल्वेने एक लाखाहून अधिक नोकऱ्या देण्यासाठी जानेवारी 2019 मध्ये रिक्त जागा काढल्या होत्या.More than one lakh new jobs in railways, results to be announced by January 15

या सर्व पदांसाठीची भरती प्रक्रिया डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होईल असे रेल्वेचे नियोजन होते. मात्र, सुमारे अडीच कोटी अर्ज आणि नंतर कोविड 19 ने ही भरती प्रक्रिया अनेकवेळा रखडली. रेल्वे भरती बोडार्ने जानेवारी 2019 मध्ये सुमारे 1.5 लाख पदांसाठी भरती जारी केली होती. रेल्वेत ही जागा 4 वर्षांनंतर आली



, त्यामुळे 2 कोटी 40 लाखांहून अधिक अर्ज आले. जानेवारी 2019 मध्ये फफइ ने गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणीसाठी 35281 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या होत्या. त्याअंतर्गत स्टेशन मास्तर, गार्ड, कमर्शियल क्लार्क, सामान्य लिपिक, ट्रेन क्लार्क अशा पदांवर नोकºया दिल्या जाणार आहेत. मात्र इतक्या पदांसाठी रेल्वेकडे 12630885 अर्ज आलेत.

यासाठी रेल्वेने कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट घेतली. कोविड 19 मुळे या परीक्षेवर परिणाम झाला. ही परीक्षा 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 208 शहरांमध्ये 8 टप्प्यांत घेण्यात आली. यापैकी 7 टप्प्यांची परीक्षा कोविडपूर्वी घेण्यात आली होती.

या परीक्षेतील कोणत्याही प्रश्नाशी संबंधित आक्षेपही रेल्वेने मागवलेत. 18.08.21 ते 23.08.21 पर्यंत रेल्वेला 93263 प्रश्नांबाबत ऑनलाईन हरकती प्राप्त झाल्यात. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. यापैकी योग्य त्याप्रमाणे चुकीचे प्रश्न काढून एकूण गुण जोडले जातील. त्यानंतरच दुसºया टप्प्याची गुणवत्ता यादी 15 जानेवारीला प्रसिद्ध होईल.

More than one lakh new jobs in railways, results to be announced by January 15

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात