हवाई दलात अग्निवीरांना मोठ्या सुविधा ;भरतीचा तपशील जाहीर, 1 कोटींचा विमा, कॅन्टीन सुविधा, 30 दिवस सुटी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी हवाई दलाने त्यांच्या वेबसाइटवर तपशील जारी केला आहे. या तपशिलानुसार, चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातील, ज्या कायमस्वरूपी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांनुसार असतील. वायुसेनेच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार, पगारासह अग्निवीरांना हार्डशिप अलाउन्स, युनिफॉर्म अलाउन्स, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सुविधादेखील मिळतील. या सुविधा नियमित सैनिकाला मिळतात.More facilities for firefighters in Air Force: Recruitment details announced, 1 crore insurance, canteen facilities, 30 days leave



अग्निवीरांना सेवा कालावधीत प्रवास भत्ताही मिळेल. याशिवाय त्यांना वर्षातून 30 दिवसांची रजा मिळणार आहे. त्यांच्यासाठी वैद्यकीय रजेची व्यवस्था वेगळी आहे. अग्निवीरांना सीएसडी कॅन्टीनची सुविधाही मिळणार आहे. सेवेदरम्यान (चार वर्षे) दुर्दैवाने अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळेल. याअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला सुमारे एक कोटी रुपये मिळणार आहेत.

कामगिरीच्या आधारे नियमित केडर मिळेल

वायुसेना कायदा 1950 अंतर्गत त्यांची हवाई दलात भरती 4 वर्षांसाठी असेल, असे हवाई दलाने म्हटले आहे. हवाई दलात अग्निवीरांची वेगळी रँक असेल, जी सध्याच्या रँकपेक्षा वेगळी असेल. अग्निपथ योजनेच्या सर्व अटींचे अग्निवीरांना पालन करावे लागेल. वायुसेनेत नियुक्तीच्या वेळी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अग्निवीरांना त्यांच्या पालकांची स्वाक्षरी असलेले नियुक्ती पत्र घ्यावे लागेल. चार वर्षांच्या सेवेनंतर 25 टक्के अग्निवीरांना नियमित केडरमध्ये घेतले जाईल. या 25 टक्के अग्निवीरांची नियुक्ती त्यांच्या सेवा कालावधीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.

सन्मान आणि पुरस्कारास पात्र

वायुसेनेनुसार अग्निवीर हा सन्मान आणि पुरस्काराचा हक्कदार असेल. वायुसेनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अग्निवीरांना सन्मान आणि पुरस्कार दिले जातील. हवाई दलात भरती झाल्यानंतर अग्निवीरांना लष्कराच्या गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास

अग्निवीरांना 4 वर्षांच्या सेवा कालावधीत 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. याशिवाय त्यांना 44 लाख रुपयांची एकरकमी रक्कमही दिली जाणार आहे. याशिवाय जेवढी नोकरी शिल्लक तितका पगारही अग्निवीरच्या कुटुंबीयांना चार वर्षांच्या सेवेसाठी दिला जाणार आहे. याशिवाय अग्निवीरच्या सेवानिवृत्ती निधीमध्ये जमा झालेल्या रकमेवरील सरकारी योगदान आणि व्याजही अग्निवीरच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.

More facilities for firefighters in Air Force: Recruitment details announced, 1 crore insurance, canteen facilities, 30 days leave

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!