संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी विरोधकांच्या गोंधळाचीच चर्चा जास्त होत आहे. गेले दोन दिवस घोषणाबाजी करून कामकाज बंद पाडणाऱ्या विरोधकांनी आता मात्र हद्द ओलांडली आहे. तृणमूल खासदारांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातील निवेदन हिसकावून ते फाडले आणि उपसभापतींच्या दिशेने भिरकावले आहे. monsoon session tmc mps tear papers as it minister vaishnaw reads statement on pegasus report
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी विरोधकांच्या गोंधळाचीच चर्चा जास्त होत आहे. गेले दोन दिवस घोषणाबाजी करून कामकाज बंद पाडणाऱ्या विरोधकांनी आता मात्र हद्द ओलांडली आहे. तृणमूल खासदारांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातील निवेदन हिसकावून ते फाडले आणि उपसभापतींच्या दिशेने भिरकावले आहे.
राज्यसभेत जेव्हा आयटी मंत्री अश्विनी वैष्णव पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर निवेदन देण्यासाठी उभे राहिले, तेव्हा टीएमसीचे खासदार शांतनु सेन यांनी त्यांच्या हातातून निवेदन पत्र हिसकावून ते फाडले व उपसभापतींकडे फेकले.
यानंतर भाजपचे खासदार पुढे गेले आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या घडामोडींनंतर शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सदन तहकूब करण्यात आले. या घटनेवर समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव म्हणाले की, जर कुणी कॉपी घेतली असेल तर ते चुकीचे आहे, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी तेथे नव्हतो. मी उशिरा आलो होतो.
पेगॅसस हेरगिरी प्रकरणातील राज्यसभेत होणार्या या गदारोळापूर्वी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सर्व संबंधित पक्षांनी जाहीर केलेला अहवाल यापूर्वीच नाकारला आहे. मी सर्व सदस्यांना तपशीलवार अहवाल वाचण्याची विनंती करतो.
त्याच वेळी लोकसभेत आयटी मंत्र्यांनी पेगॅसससंदर्भातील अहवालास चुकीचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, हेरगिरीशी डेटाचा काही संबंध नाही. सादर केलेल्या अहवालातील तथ्य दिशाभूल करणारे आहेत. या आरोपाला कोणतेही आधार नाही. असे आरोप यापूर्वीही केले गेले आहेत. यापूर्वी एनएसओनेही असा आरोप फेटाळून लावला आहे.
हा अहवाल केवळ खळबळजनक असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याशिवाय यात काही अर्थ नाही. अशा प्रकारे इंटरसेप्ट करण्याची भारतात एक स्पष्ट प्रक्रिया आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की, भारतातील अनेक पत्रकार, राजकारणी आणि इतरांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून हॅक करण्यात आले होते. यानंतर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात हाच मुद्दा लावून धरत गोंधळ घातला यामुळे संसदेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.
monsoon session tmc mps tear papers as it minister vaishnaw reads statement on pegasus report
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App