फडणवीसांच्या वाढदिवशी लोणकर कुटुंबीयांना मोठा दिलासा, 19.96 लाख रुपयांच्या थकीत कर्जाची परतफेड

BJP Help To Lonkar Family Of Rs 19.96 lakh cheque given by devendra Fadnavis

BJP Help To Lonkar Family : एमपीएससी परीक्षा पास होऊनही मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला. BJP Help To Lonkar Family Of Rs 19.96 lakh cheque given by devendra Fadnavis


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एमपीएससी परीक्षा पास होऊनही मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांना हा 19 लाख 96 हजार 965 रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे या कुटुंबीयांवर कर्ज होते.

आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा यामुळे हे कुटुंब त्रस्त होते. अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबीयांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते स्वप्नीलचे वडील सुनील तात्याबा लोणकर यांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. लोणकर यांच्यावर शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेचं कर्ज होतं. मुलगा काही दिवसांतच नोकरीला लागेल व कर्ज फेडता येईल या आशेवर लोणकर कुटुंबानं हे कर्ज घेतलं होतं. दुर्दैवानं तसं झालं नाही. स्वप्नीलनं आत्महत्या केली.

लोणकर कुटुंबीयांची ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर भाजपनं तात्काळ त्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आज पक्षातर्फे पतसंस्थेचं कर्ज फेडण्यासाठी आवश्यक ती रक्कम लोणकर कुटुंबीयांना देण्यात आली. ‘लोणकर कुटुंबीयांच्या पाठीशी भाजप यापुढंही उभा राहील व भविष्यात स्वप्नीलसारखी वेळ कोणावरही येऊ नये असा आमचा प्रयत्न असेल,’ असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. स्वप्नीलच्या वडिलांनी यावेळी भाजपचे आभार मानले. आमदार गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

स्वप्नील लोणकरनं आत्महत्या का केली?

स्वप्नील लोणकर हा तरुण एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र परीक्षा पास झाल्यानंतर दीड वर्षे उलटल्यानंतरही त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यानंतर २०२० मध्ये सुद्धा त्यानं एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. मात्र, करोनामुळे मुख्य परीक्षा झाली नाही. हे सगळं कधी होणार आणि नोकरी कधी मिळणार? या तणावातून २९ जून रोजी स्वप्नीलनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एमपीएससीच्या मायाजालात अडकू नका, असं आवाहनही त्यानं सुसाइड नोटमधून केलं होतं.

BJP Help To Lonkar Family Of Rs 19.96 lakh cheque given by devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात