आंदोलक शेतकऱ्यांना मीनाक्षी लेखी का म्हणाल्या मवाली? वाचला आंदोलकांच्या गुन्ह्यांचा पाढा!

Meenakshi Lekhi says They are not farmers they are hooligans These are criminal acts on Farm Laws protest

Meenakshi Lekhi : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी त्यांच्या एका विधानामुळे वादात सापडल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना त्या मवाली म्हणाल्या. परंतु यामागे त्यांनी कारणेही दिली आहेत. जंतर मंतर येथे कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांविषयी गुरुवारी त्या म्हणाल्या की, ते शेतकरी नाहीत. हेदेखील विचारात घेतले पाहिजे की ते गुन्हेगारी कृत्य करत आहेत. 26 जानेवारीला जे काही घडले ते लज्जास्पद होते, गुन्हेगारी कारवाया आणि अशा गोष्टींना विरोधकांनी प्रोत्साहन दिले. Meenakshi Lekhi says They are not farmers they are hooligans These are criminal acts on Farm Laws protest 


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी त्यांच्या एका विधानामुळे वादात सापडल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना त्या मवाली म्हणाल्या. परंतु यामागे त्यांनी कारणेही दिली आहेत. जंतर मंतर येथे कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांविषयी गुरुवारी त्या म्हणाल्या की, ते शेतकरी नाहीत. हेदेखील विचारात घेतले पाहिजे की ते गुन्हेगारी कृत्य करत आहेत. 26 जानेवारीला जे काही घडले ते लज्जास्पद होते, गुन्हेगारी कारवाया आणि अशा गोष्टींना विरोधकांनी प्रोत्साहन दिले.

भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना लेखी म्हणाल्या, सर्वप्रथम त्यांना शेतकरी म्हणणे थांबवा. कारण ते शेतकरी नाहीत. काही षडयंत्रकारांच्या हातात अडकलेले लोक आहेत, जे सतत शेतकऱ्यांच्या नावावर अशी कृत्ये करत आहेत. खऱ्या शेतकर्‍यांना जंतर मंतरवर येऊन आंदोलन करायला वेळ नाही. ते त्यांच्या शेतात काम करत आहेत. हे असे लोक आहेत जे आडत्यांनी नियुक्त केलेले आहेत, ज्यांना खऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशी इच्छा नाही.

यावर भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत म्हणाले, “शेतकरी मवाली नाहीत, अशा गोष्टी शेतकऱ्यांबद्दल बोलू नये. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. शांततेत आंदोलन करण्याचा हा एक मार्गदेखील आहे. जोपर्यंत संसद चालत नाही तोपर्यंत आम्ही येथे येत राहू. जर सरकारला हवे असेल तर चर्चा सुरू होईल.”

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी जंतर-मंतरवर आंदोलन करण्याचा आणि ‘किसान संवाद’ आयोजित करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. कडक पोलीस बंदोबस्तासह 200 शेतकरी बसमध्ये सिंघू सीमेवरून जंतर-मंतरवर पोहोचले आणि सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत निषेधार्थ सहभागी झाले. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, संसद चालत नाही तोपर्यंत ते दररोज ही निदर्शने सुरू ठेवतील. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले आणि ते 13 ऑगस्ट रोजी संपेल.

Meenakshi Lekhi says They are not farmers they are hooligans These are criminal acts on Farm Laws protest

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात