Moneycontrol apologizes for false report on oxygen exports : प्रसिद्ध अर्थविषयक संकेतस्थळ मनिकंट्रोलने ऑक्सिजन निर्यातीचे खोटे वृत्त दिल्याबद्दल माफीनामा प्रसिद्ध केला आहे. मनिकंट्रोलच्या याच वृत्ताच्या आधारे काँग्रेस खासदार राहुल गांधी व काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आक्रमक होता केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. परंतु आता मनिकंट्रोलने याबाबत खुलासाही प्रसिद्ध केला आहे. Moneycontrol apologizes for false report on oxygen exports, Deleted Misleading Article
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रसिद्ध अर्थविषयक संकेतस्थळ मनिकंट्रोलने ऑक्सिजन निर्यातीचे खोटे वृत्त दिल्याबद्दल माफीनामा प्रसिद्ध केला आहे. मनिकंट्रोलच्या याच वृत्ताच्या आधारे काँग्रेस खासदार राहुल गांधी व काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आक्रमक होता केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. परंतु आता मनिकंट्रोलने याबाबत खुलासाही प्रसिद्ध केला आहे.
मनिकंट्रोल या अर्थविषयक घडामोडींच्या संकेतस्थळाने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, ते वृत्त डिलीट करण्यात आले आहे. कारण यामधून औद्योगिक वापरासाठीच्या ऑक्सिजन निर्यातीबद्दल भारताची चुकीची प्रतिमा उभी राहिली होती, शिवाय यामुळे अकारण तणावही निर्माण झाला होता. वास्तविक, औद्योगिक वापरासाठीच्या ऑक्सिजनचा गत आर्थिक वर्षाच्या (2020-21) तीन तिमाहींमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात झाली होती. जी 9,294 मेट्रिक टन एवढी किरकोळ होती. वास्तविक, हा आकडा देशात दररोज तयार होत असलेल्या ऑक्सिजनपेक्षा फक्त थोडा जास्त आहे. मुळात हे आर्टिकल पब्लिशच व्हायला नको होते, चुकीबद्दल क्षमस्व! – संपादक
pic.twitter.com/3uwlELwGck — Moneycontrol (@moneycontrolcom) April 21, 2021
pic.twitter.com/3uwlELwGck
— Moneycontrol (@moneycontrolcom) April 21, 2021
मनिकंट्रोलच्या त्या डिलीट झालेल्या लेखामध्ये आणीबाणीच्या काळातही भारतातून परदेशात ऑक्सिजनची निर्यात झाली, असा उल्लेख होता. परंतु निर्यात झालेल्या ऑक्सिजनची नोंद ही जानेवारी महिन्यातील आहे. शिवाय निर्यात झालेला ऑक्सिजन हा वैद्यकीय वापराचा नसून औद्योगिक वापराचा होता, हे येथे लक्षात घेण्यात आले नाही. उलटपक्षी, भारत सरकारने कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भयावह रूप धारण केल्याचे लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्यातीवर बंदी घातलेली आहे. फक्त 9 अत्यावश्यक क्षेत्रे वगळता इतर ठिकाणी औद्योगिक वापरास बंदीही घालण्यात आली आहे. याशिवाय विविध खासगी तसेच सरकारी कंपन्यांना वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन तयार करण्याचे आवाहन केलेले आहे. यामुळे देशात आता ऑक्सिजन उत्पादन वाढले आहे. परिपूर्ण माहिती न घेता खळबळजनक बातमी दिल्यामुळे मनिकंट्रोलवर माफी मागण्याची नामुष्की ओढावली आहे.
याच वृत्ताच्या आधारावर केंद्र सरकारला दोष देणारे राजकारणीही यामुळे तोंडावर आपटले आहेत. 21 एप्रिल रोजी केंद्र सरकारने या चुकीच्या वृत्ताबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जानेवारी 2021 ते मार्च 2021 या काळात भारताने 9884 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनची निर्यात केली हे वृत्त पूर्णपणे चुकीचे व लोकांमध्ये चुकीचा प्रपोगेंडा पसरवणार आहे. केंद्राने म्हटले की, दिलेले वृत्त पूर्णपणे चुकीचे असून इंडस्ट्रियन ऑक्सिजनच्या जागी मेडिकल ऑक्सिजन असा शब्द वापरण्यात आला आहे.
गंमत बघा, नेमकी हेच चुकीचे वृत्त सातत्याने फेक न्यूज देऊन गोत्यात आलेल्या एनडीटीव्हीनेही दिले आहे. एवढे सगळे होऊनही एनडीटीव्हीने माफी मागण्याचे सौजन्यही दाखवलेले नाही.
वास्तविक, लिक्विड ऑक्सिजनच्या निर्यातीसाठी दोन वर्गवारी आहेत. एक मेडिकल आणि दुसरी इंडस्ट्रियल. एप्रिल- फेब्रुवारी 2020-21 दरम्यान भारताने 9884 मेट्रिक टन इंडस्ट्रियल ऑक्सिजनची निर्यात केली, परंतु याच काळात मेडिकल ऑक्सिजनची केवळ 12 मेट्रिक टन एवढीच निर्यात झाली आहे.
या इंडस्ट्रियल ऑक्सिजनच्या निर्यातीचा मोठा भाग डिसेंबर आणि जानेवारीत होता. जेव्हा मेडिकल ऑक्सिजनचा देशातील खप हा 2675 मेट्रिक टन प्रति दिनवरून 1418 मेट्रिक टन प्रति दिन एवढा घटला होता. देशात जवळपास 7000 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन दररोज उत्पादित होतो. यामुळे मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्याला धोका उत्पन्न झाला, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.
Moneycontrol apologizes for false report on oxygen exports, Deleted Misleading Article
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App