ताई एकदम ठणठणीत, तरीही नेत्यांकडून त्यांच्या निधनाचे ट्वीट, वाचा काय म्हणाल्या सुमित्राताई महाजन!

Sumitra tai Mahajan Says what was the urgency in announcing of so called demise without confirmation

Sumitra tai Mahajan : माजी लोकसभा अध्यक्षा व ज्येष्ठ भाजप नेत्या सुमित्राताई महाजन यांच्या निधनाची बातमी काही नेत्यांनी काल ट्वीट केली. वास्तविक, सुमित्राताई महाजन या थोड्या आजारी असल्याने त्यांना इंदूरमधील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना थोडा ताप होता. गुरुवारी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सुमित्राताईंच्या निधनाचे ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. याशिवाय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही अशाच प्रकारचे ट्विट केले होते. Sumitra tai Mahajan Says what was the urgency in announcing of so called demise without confirmation


विशेष प्रतिनिधी

इंदूर : माजी लोकसभा अध्यक्षा व ज्येष्ठ भाजप नेत्या सुमित्राताई महाजन यांच्या निधनाची बातमी काही नेत्यांनी काल ट्वीट केली. वास्तविक, सुमित्राताई महाजन या थोड्या आजारी असल्याने त्यांना इंदूरमधील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना थोडा ताप होता. गुरुवारी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सुमित्राताईंच्या निधनाचे ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. याशिवाय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही अशाच प्रकारचे ट्विट केले होते.

सुमित्राताई म्हणाल्या, किमान एकदा कन्फर्म तरी करा…

माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांना माध्यम प्रतिनिधींनी या निधनाच्या खोट्या वृत्ताबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, वृत्तवाहिन्या माझ्या तथाकथित निधनाच्या बातम्या कसे दाखवू शकतात? किमान एकदा क्रॉस चेक तरी करायचे ना? माझ्या पुतणीने श्रीयुत थरूर यांना ट्विटरवर हे लक्षात आणून दिले. पण प्रश्न असा आहे की, कन्फर्म न करता घोषणा करण्याची एवढी घाई काय आहे?

थरूर यांनी डिलीट केलं ट्वीट

काँग्रेस नेते शशी थरून यांनी ट्वीट करून सुमित्रा महाजन यांच्या निधनाचे वृत्त दिले होते. परंतु भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांना ही चूक लक्षात आणून दिली. यानंतर शशी थरूर यांनी आपले ते ट्वीट डिलीट करून चूक लक्षात आणून दिल्याबद्दल विजयवर्गीय यांचे आभार मानले. अफवांना बळी पडल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

सुप्रिया सुळेंनीही केलं होतं ट्वीट

Sumitra tai Mahajan Says what was the urgency in announcing of so called demise without confirmation

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विटरवर सुमित्रा महाजन यांच्या निधन झाल्याचं सांगत त्यांना श्रद्धांजली वाहणारं ट्विट केलं होतं. परंतु, ही बातमी खोटी असल्याचे कळताच त्यांनीही तत्परतेनं आपलं ते ट्वीट डिलीट केलं आहे.

Sumitra tai Mahajan Says what was the urgency in announcing of so called demise without confirmation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात