विरार अग्निकांड : मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, मृतांच्या नातेवाईकांना राज्याकडून ५ लाखांची, तर केंद्राकडून २ लाखांची मदत जाहीर

Virar Covid Center fire : CM Thackeray orders inquiry, Rs 5 lakh For families who lost their lives in Tragic incident

Virar Covid Center fire : पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेत असलेल्या विजय वल्लभ कोविड सेंटरच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे. या आगीच्या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दुसरीकडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना 5 लाख रुपयांची मदत राज्य शासनातर्फे देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. Virar Covid Center fire : CM Thackeray orders inquiry, Rs 5 lakh For families who lost their lives in Tragic incident


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेत असलेल्या विजय वल्लभ कोविड सेंटरच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे. या आगीच्या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दुसरीकडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना 5 लाख रुपयांची मदत राज्य शासनातर्फे देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

विरार अग्निकांडात 13 जणांचा मृत्यू

आगीच्या वेळी  (Virar Covid Center fire) आयसीयूमध्ये 15 रुग्ण होते. संपूर्ण केंद्रात 90 रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ऑक्सिजनवर असलेल्या 21 रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे 3.25 वाजता ही आगीची घटना घडली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. हे कोविड सेंटर दुसर्‍या मजल्यावर आहे. आगीचे कारण एसीमधील शॉर्टसर्किट असल्याचे बोलले जात आहे. आग लागल्यावर तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णांना आत सोडून बाहेर पळ काढल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. आगीच्या दुर्घटनेत एकूण 13 जणांचा जीव गेला.

दोषींना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही मोठी दुर्घटना आहे. या दुर्घटनेसाठी जे जबाबदार आहेत त्यांना सोडले जाणार नाही. राज्य सरकारतर्फे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश, मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरार अग्निकांडाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले. उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रूग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख, मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरारमधील विजय वल्लभ कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांप्रति शोक व्यक्त केला आहे. याबरोबरच त्यांनी इतर होरपळलेले रुग्ण लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान सहायता निधीमधून विरार अग्निकांडा जीव गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत केंद्राकडून देण्यात येणार आहे.

गृहमंत्र्यांकडून शोक व्यक्त

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे विरार घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, वसई विरारच्या एका कोविड रुग्णालयात आग लागून झालेल्या हृदयविदारक दुर्घटनेमुळे अत्यंत दु:खी आहे. दु:खाच्या या काळात शोकसंतप्त कुटुंबीयांच्या सोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे होण्याची ईश्वराला प्रार्थना करतो.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले दु:ख

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पालघरमध्ये कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेल्या मृत्यूंमुळे दु:ख वाटतंय. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना आहेत. जे जखमी आहेत ते लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो.

देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त, सखोल चौकशीची मागणी

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर आपल्या भावना प्रकट केल्या. ते म्हणाले की, ही अतिशय सुन्न करणारी घटना आहे. विरार कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या मृत्यूंमुळे अतिव दु:ख होत आहे. मृतांच्या कुटुंबीयांना माझ्या सहवेदना आहेत. जखमी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. आम्ही या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आहोत, तसेच जे दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

Virar Covid Center fire : CM Thackeray orders inquiry, Rs 5 lakh For families who lost their lives in Tragic incident

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात