विशेष प्रतिनिधी
मुंबई : आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा, पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाºया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.Money from centre, Devendra Fadnavis vision and Chamkogiri Uddhav Thackeray, Atul Bhatkhalkar alleges
कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना याला विरोध केला. यावेळी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही घरांची पाडापाड सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून कारवाईला विरोध सुरू केला.
कारवाईला विरोध केल्याप्रकरणी भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी भातखळकर यांनीही ट्वीट करून माहिती दिली असून, ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.कुरार मेट्रो स्टेशनच्या कामामुळे बाधित होणाºया मालाड पूर्व येथील सुमारे १५० रहिवाश्यांना मुंबई महानगरपालिकेनं घरे रिकामी करण्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या.
त्यानंतर या घरांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. याप्रकरणावरून अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. भातखळकर म्हणाले, ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली.
या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत. मराठी माणसाचं नाव घेऊन पक्षाचं दुकान चालवायचं आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले; त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उद्ध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?
गिरगाव येथील बाधितांना जागेच्या इतकीच जागा स्थानिक ठिकाणी देऊन पुनर्वसन करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता; त्याच धर्तीवर मालाड पूर्व येथील बाधितांचे सुद्धा पुनवर्सन झाले पाहिजे, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. आम्ही आंदोलन करणारच आहे.
उच्च न्यायालयाने कोविड काळात घरं तोडण्यास मनाई केलेली आहे, असं असतानाही पोलिसांनी बळजबरी करत कारवाई केली. याविरोधात आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App