खासदार राजीव प्रताप रुडी यांनी केले भाजपाच्या नेत्यांच्या विमानाचे सारथ्य, मनोज तिवारी यांची सहा महिन्यांची मुलगीही सोबत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री राजीव प्रताप रुडी संसदेच्या नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन स्थायी समितीच्या सदस्यांच्या विमानाचे खास सारथ्य करणार आहेत. रुडी यांनी ट्विटरवर व्हिडीओ टाकून याबाबत माहिती दिली आहे.MP Rajiv Pratap Rudy flew the BJP leader’s plane, along with Manoj Tiwari’s six-month-old daughter

रुडी हे कमर्शीअल पायलट असून अनाऊन्समेंट करताना दिसत आहेत. त्यामध्ये म्हणत आहेत की बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिर्थसिंग रावत, भापा खासदार मनोज तिवारी आणि अनेक खासदार आणि त्यांचे कुटुंबिय इंडिग्स करोच्या विमानातून प्रवास करत असल्याचे सागत आहे.



आपल्यासाठी हा एक सुंदर आणि ऐतिहासिक दिवस असल्याचे रुडी म्हणत आहेत.रुडी यावेळी प्रवाशांना आवाहन करत आहेत की विमानातील सर्वात लहान प्रवाशाचे स्वागत करा. खासदार मनोज तिवारी यांची सहा महिन्यांची मुलगी सानविका ही देखील या प्रवसात सोबत होती.

आमच्या बरोबर आजचा सर्वात छोटा प्रवासी लहान बाळ सानिका आहे. तिच्या पहिल्या प्रवासासाठी सगळ्यांनी शुभेच्छा द्या असेही ते म्हणत आहेत.द्रविड मुनेत्र कळघमचे खासदार दयानिधी मारन यांनी नुकताच रुडी यांच्या विमानातून प्रवास केला होता.

संसदेचे एक खासदार आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री आज आमच्या विमानाचे सारथ्य करत आहेत. आम्हाला दिल्लीहून चेन्नईला सुखरूपपणे उड्डाण दिल्याबद्दल खासदार कॅप्टन राजीवप्रताप रुडी यांचे आभार! असे त्यांनी म्हटले होते.

MP Rajiv Pratap Rudy flew the BJP leader’s plane, along with Manoj Tiwari’s six-month-old daughter

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात