विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये मागच्या शनिवारी घडलेल्या हिंसक घटनेतील मुख्य आरोपी मोहम्मद अन्सारचा थेट आम आदमी पाटीर्शी संबंध आहे. तो या पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. तसेच आम आदमी पाटीर्चे मंत्री आणि नेत्यांशीही जवळचे संबंध आहेत. आपच्या अनेक कार्यक्रमातील त्याची छायाचित्रे झळकली आहेत, असा आरोप भाजपचे नेते आदेश गुप्ता यांनी केला आहे.Mohammed Ansar, the mastermind of the Delhi violence, Aap activist, accused the BJP
गुप्ता यांनी आरोप केला की, केजरीवाल सरकार बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशच्या नागरिकांना आणि रोहिंग्यांना मोफत रेशन, पाणी आणि वीज देत आहे. दिल्ली सरकारच्या याच धोरणाचा परिपाक म्हणजे जहांगीरपुरीतील हिंसक घटना होय.
आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिषी यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, जहांगीरपुरीतील हिंसाचाराचा मुख्य आरोपी अन्सार हा भाजपचा नेता असून भाजपमध्ये सक्रिय आहे. आतिषी यांंनी ट्विटवर अन्सारची काही छायाचित्रे जोडली आहेत. यात अन्सारला भाजपची टोपी घातल्याचे आणि निवडणूक चिन्ह लावल्याचे दाखविण्यात आले आहे. भाजपच दंगली घडवितो.
काल आमच्या नेत्याने काढलेल्या शोभा मिरवणुकीदरम्यान काहीही घडले नाही. सर्व शांततापूर्ण होते. मुख्यमंत्री हेही एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होते. काहीही समस्या निर्माण झाली नाही; परंतु, भाजपतर्फे मिरवणूक काढली जाते, तेव्हा त्यांचे लोक सामील होतात आणि दंगल होते.
आता अन्सारचा संबंध तृणमूल काँग्रेसशीही जोडला जात आहे. सोशल मीडियात त्याचे काही बनावट अकाऊंटही मिळाले आहेत. त्यात त्याने स्वत:ला राज मल्होत्रा संबोधले आहे.अन्सारला या घटनेचा सूत्रधार मानले जाते. त्याच्यावरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे. केंद्र आणि दिल्लीचे सत्ताधारी भाजप आणि आम आदमी पार्टी यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. भाजप अन्सारचा संबंध ह्यआपह्णशी जोडत आहे, तर आपही अन्सारचा संबंध भाजपशी जोडला आहे.
जहांगीरपुरी हिंसाचाराचा मुख्य आरोपी मोहम्मद अन्सार (३५) भंगाराचे काम करतो. त्याच्या पत्नीचे नाव सकीना असून तो तीन मुली आणि दोन मुलांचा पिता आहे. त्याच्याविरुद्ध मारहाणीचे दोन गुन्हे आहेत. जुगारीचे पाच गुन्हेही आहेत. २००९ आणि २०१८ मध्ये त्याने तुरुंगवारीही केली आहे. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनुसार मिरवणूक सी ब्लॉक येथील एका प्रार्थना स्थळाजवळ आली, तेव्हा ४-५ साथीदारांसोबत आलेल्या अन्सारने मिरवणुकीतील लोकांशी वाद घातला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App