मोदींची तब्बल दोन वर्षांनी आईशी भेट गृहराज्यातील पंचायत महासंमेलनात मार्गदर्शन


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते गांधीनगरला पोहोचले आणि आई हीराबेनला भेटायला गेले. मोदींनी तब्बल दोन वर्षांनी आईची भेट घेतली. यापूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये मोदी आई हीराबेन यांना भेटण्यासाठी आले होते. Modi’s visit to his mother after two years Guidance at Home Panchayat General Convention

तत्पूर्वी, उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर मोदी यांनी शुक्रवारी अहमदाबादमध्ये गुजरातमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी १० किमी लांबीचा रोड शो केला. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.यानंतर पंतप्रधानांनी आपल्या गृहराज्यातील पंचायत महासंमेलनात एक लाखाहून अधिक पंचायत प्रतिनिधींना संबोधित करताना सांगितले की, विकासामुळे जनतेने यूपी, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपला पुन्हा संधी दिली आहे.

ते म्हणाले की, लोकशाहीच्या ताकदीमुळे भाजपला या राज्यांमध्ये पुन्हा सत्ता मिळाली आहे, जिथे सरकारला सलग दुसरी संधी मिळत नाही. लोकांनी विकासाला कौल दिल्याने हे शक्य झाले आहे. महात्मा गांधींचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत जेव्हा स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे, तेव्हा त्यांचे ग्रामीण विकासाचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे.

ग्रामीण केंद्रांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट पंचायत प्रतिनिधींना देत ते म्हणाले की, गावे स्वावलंबी आणि सशक्त बनविण्याची गरज आहे. गुजरात ही महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची भूमी आहे. बापू नेहमीच ग्रामीण विकास आणि गावांना स्वावलंबी बनवण्याविषयी बोलत. ग्रामस्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंचायत राजची मजबूत रचना अत्यंत आवश्यक आहे.

Modi’s visit to his mother after two years Guidance at Home Panchayat General Convention

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती