पंतप्रधान मोदी यांचा पुन्हा यूपीमध्ये झंजावाती दौरा; गंगा एक्सप्रेसवेचा समारंभ


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुन्हा उत्तर प्रदेशात झंजावाती दौरा करणार आहेत. गंगा एक्सप्रेस वे या आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा कोनशिला समारंभ शहाजहानपूर येथे त्यांच्याहस्ते होईल. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गानंतर हा देशातील सर्वाधिक अंतराबाबत दुसऱ्या क्रमांकाचा द्रुतगती मार्ग ठरेल.Modi will once again visit uP

राज्याच्या पूर्व आणि पश्चिम टोकांना जोडण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येईल. मेरठ ते प्रयागराज हा ५९४ किलोमीटरचा टप्पा असेल. दुसऱ्या टप्प्यात उत्तराखंडच्या सीमेपर्यंत मार्ग जोडण्यात येईल. प्रकल्पाच्या अंतर्गत शहाजहानपूर जिल्ह्यात हवाई धावपट्टी बांधण्यात येईल.आणीबाणीची परिस्थिती तसेच हवाई दलाच्या विमानांसाठी तिचा वापर केला जाईल.कोरोनाचा कहर सुरु असतानाही भूसंपादन प्रक्रिया ठप्प झाली नाही. वर्षभरात ८३ हजार शेतकऱ्यांकडून ९४ टक्के जमीन खरेदी करण्यात आली. गेल्या चार महिन्यांत ७१ हजार ६२१ शेतकऱ्यांकडून ९० टक्के जमीन खरेदी करण्यात आली.

Modi will once again visit uP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती