मोदींच्या नावाचा वापर करून दक्षिणेमध्ये निवडणूक जिंकणे अशक्य, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे विधान


विशेष प्रतिनिधी 

बंगलोर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी रविवारी सांगितले की, मोदींच्या नावाचा वापर करून बीजेपी दक्षिणेमधील राज्यांमध्ये निवडणूक जिंकू शकणार नाहीत.

Modi wave alone can not make you win elections says Karnataka’s former chief minister yediyurappa

डेवनगेरे येथे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला संबोधित करताना येडियुरप्पा म्हणाले की,’ पंतप्रधान मोदी यांच्या नावाने निवडणुका जिंकू, असा विश्वास बीजेपीने बाळगू नये. मोदींच्या नावाचा वापर करून तुम्हाला लोकसभेच्या निवडणुका जिंकणे कदाचित सोपे असेल पण स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना विकासाची कामे करावी लागतात आणि ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही करावा लागतो.’


Delhi: Karnataka Chief Minister BS Yediyurappa and Union Ministers Pralhad Joshi & DV Sadananda Gowda perform ‘puja’ for construction work of Cauvery Karnataka Bhavan.


कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यामध्ये सध्या नागरी निवडणुका लढवण्याची तयारी चालू आहे. येडियुरप्पा यांनी 26 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाचा पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला कमी लेखू नये असा सल्लाही दिला.

येडीयुरप्पा यांनी कॉंग्रेस नेत्यांवर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. येडियुरप्पा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ओबीसी, एससी, एसटी समाजातील अधिकाधिक नेत्यांना सामावून घेण्याचे आवाहन केले आहे.

Modi wave alone can not make you win elections says Karnataka’s former chief minister yediyurappa

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात