मिताली राज : महिला क्रिकेटची “सचिन तेंडुलकर” क्रिकेटमधून निवृत्त!!; अशी आहे झळाळती कारकीर्द!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर म्हणून ओळख निर्माण केलेली भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार मिताली राज हिने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.  Mitali Raj retires from all forms of cricket

मिताली राजच्या निवृत्तीमुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका मोठ्या झळाळत्या कारकीर्दीचे संचित बरोबर घेऊन मिताली आता आपल्या पुढच्या जीवनाची मार्गक्रमणा करणार आहे. 39 वर्षीय मिताली राज सिंगल आहे.

– अशी आहे झळाळती कारकीर्द

मिताली राज 23 वर्षे क्रिकेट खेळली आहे. मिताली राजने 14 जानेवारी 2002 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. मितालीने भारतीय महिला क्रिकेट संघाला १९ वर्षे आणि २६२ दिवस दिले आहेत. इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना लखनऊ येथे खेळली होती, तर शेवटचा सामना 3 ऑक्टोबर 2021 ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. मिताली राजने आतापर्यंत 12 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 89 टी 20 सामने खेळली आहे.

– मितालीने 12 कसोटी सामन्यात 699 धावा केल्या आहेत. त्यात 214 ही सर्वोत्तम खेळी होती. मितालीने कसोटी सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकं झळकावली आहे. तर गोलंदाजी करताना 32 धावा दिल्या आहेत. मात्र कसोटीत तिला एकही गडी बाद करता आला नाही.

– मिताली 232 एकदिवसीय सामने खेळली असून 7805 धावा केल्या आहेत. नाबाद 125 ही तिची सर्वोत्तम खेळी होती. एकदिवसीय कारकिर्दीत तिने 7 शतकं आणि 64 अर्धशतके झळकावली आहेत. तर गोलंदाजी करताना 8 गडी बाद केले आहेत.

– टी 20 प्रकारात मितालीने 89 सामने खेळले असून 2364 धावा केल्या आहेत.  मितालीने 64 अर्धशतकं झळकावली आहेत. तर नाबाद 97 ही सर्वोत्तम खेळी होती.

– बनायचे होते नृत्यांगना, झाली क्रिकेटर

मिताली राज हिला आधी क्रिकेटर बनायचे नव्हते, तर तुझ्या नृत्यांगना बनायचे होते. परंतु, वडिलांनी नृत्यांगना होण्याऐवजी तिला क्रिकेटर होण्यास प्रोत्साहन दिले आणि त्यानंतर एक मोठी क्रिकेट कारकीर्द भारतीयांसमोर साकार झाली.

Mitali Raj retires from all forms of cricket

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात