प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे भारतावर तिसऱ्या लाटेचे संकट ओढवले आहे. दिल्ली, मुंबईसारख्या महत्वाच्या शहरात पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहेत. नागरिकांना बूस्टर डोस, मास्क लावणे तसेच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता आयुष मंत्रालयाने कोरोना महामारी रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.Ministry of AYUSH announces Ayurvedic remedies for corona prevention .
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सामान्य उपाय म्हणून दिवसभरात अनेक वेळा कोमट पाणी प्या, दिवसातून किमान ३० मिनिटे योग, प्राणायाम आणि ध्यान करा. हळद, जिरे, धणे अशा मसाल्यांचा जेवणात समावेश करावा. स्वयंपाक करताना लसूण वापरावा, असा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे.
यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोनापासून तुमचे संरक्षण होण्यास मदत होईल, असे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App