U. P. Elections Mayawati : मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची शोकांतिका, १२ टक्के मते मिळूनही फक्त १ जागा


विशेष प्रतिनिधी

लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपने २५५ जागा जिंकून जरी विजयाची पतका फडकवली असली, तरी बाकीच्या पक्षांचे मतांच्या टक्केवारीतून निर्माण झालेले आव्हान दुर्लक्षित करता येणार नाही. परंतु, सगळ्यात दुर्दशा मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची झाली आहे. काँग्रेससारखी ही अवस्था नाही. mayawati bsp got 12.88% votes but could not convert into seats, bsp got only one seat

बहुजन समाज पक्षाच्या मतांच्या एकूण टक्केवारीत घट जरूर झाली असली, तरी त्या पक्षाला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. बहुजन समाज पक्षाला १२.८८ टक्के मते मिळाली आहे. दुर्दैवाने त्या मतांचे त्या टक्केवारीच्या प्रमाणात जागांमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. बसपला फक्त १ जागेवर विजय मिळवता आला. काँग्रेसला फक्त २.३३ टक्के मते मिळाली तरी त्या पक्षाचे २ आमदार निवडून आले. पण मायावतींच्या बसपला १२.८८ टक्के मते मिळूनही फक्त १ आमदाराला निवडून आणता आले.



मायावतींची अवस्था बंगालमधल्या कम्युनिस्टांसारखी होता होता ऱाहिली. कारण बंगालमध्ये कम्युनिस्टांनाही १०.२४ टक्के मते मिळाली पण त्यांना २९२ पैकी एकही आमदार बंगालमध्ये निवडून आणता आला नाही. मायावतींना एक आमदार निवडून आणता आल्याने त्यांच्या बसपची कम्युनिस्टांसारखी अवस्था झाली नाही. पण एकेकाळी बंगालचा सर्वसत्ताधीश कम्युनिस्ट पक्ष तिथे शून्य झाला, तशाच २००८ मध्ये उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमतानिशी सत्तेवर आलेल्या मायावती आज फक्त १ आमदार निवडून आणू शकल्या आहेत. बसपला १२.८८ टक्के अशी डबल डिजिट मते मिळूनही ही शोकांतिका झाली आहे.

जाटव – दलित मते बसपला मिळाली. पण ती निर्णायक विजय मिळवून देऊ शकली नाहीत. जागांमध्ये त्याचे रुपांतर झाले नाही. मुस्लीम मतदारांनी बसपकडे पूर्णपणे पाठ फिरवली. ती सगळी समाजवादी पक्षाला गेली.

मतांची टक्केवारी

  • भाजप – ४१.२९
  • समाजवादी पक्ष – ३२.६
  • बसप – १२.८८
  • काँग्रेस – २.३३
  • राष्ट्रवादी काँग्रेस – ०.०५
  • शिवसेना – ०.०२
  • राष्ट्रीय लोकदल – २.८५
  • इतर – ६.७४

mayawati bsp got 12.88% votes but could not convert into seats, bsp got only one seat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात