CONGRESS DEFEAT:अभिषेक मनू सिंघवी यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल ! दारुण पराभवानंतर नाराज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते-G23 च्या बैठकीपूर्वी सोनियांनी बोलावली बैठक …


CONGRESS DEFEAT:अभिषेक मनू सिंघवी यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल ! दारुण पराभवानंतर नाराज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते-G23 च्या बैठकीपूर्वी सोनियांनी बोलावली बैठक …


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते चांगलेच नाराज आहेत .यावर खंत आणि संताप व्यक्त करत G 23 च्या नेत्यांनी
राहुल गांधी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.नाराज नेत्यांनी कोणतेही पाऊल उचलण्या पूर्वीच हायकमांडने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे .CONGRESS DEFEAT: Abhishek Manu Singhvi attacks Rahul Gandhi! After the catastrophic defeat, the senior Congress leader- Sonia called a meeting before the G23 meeting …

ग्रुप-२३चा कोणताही नेता हल्लाबोल करण्यापूर्वीच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची बैठक बोलाविण्याची घोषणा केली आहे. त्या बैठकीत राहुल यांच्याबाबतची नाराजी निघून जावी, असा त्या मागील उद्देश आहे.

असे असले तरी काँग्रेसचे अनेक मोठे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत.

सर्वांत पहिला हल्ला पक्षाचे खा. अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेस एकापाठोपाठ एक निवडणुका हारत चालली आहे. परंतु २०१४ नंतर झालेल्या पराभवांपासून आम्ही कोणताही धडा शिकलेलो नाहीत. पक्षाला आत्मचिंतन करण्याबरोबरच संपूर्ण पक्षात नवीन बदल करण्याची गरज आहे. सिंघवी यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडेच होता.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेले ए. के. अँटोनी यांनी तर दुखी होऊन कोणताही हल्लाबोल केल्याशिवाय सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजकारणातून संन्यास घेतला.

CONGRESS DEFEAT: Abhishek Manu Singhvi attacks Rahul Gandhi! After the catastrophic defeat, the senior Congress leader- Sonia called a meeting before the G23 meeting …

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात