लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडला जर्मनीतून अटक


आयईडीचा वापर झाल्यानं पोलिसांना दहशतवादी हल्ल्याचा संशय होता. त्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता. Mastermind arrested in Ludhiana court bombing case from Germany


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 23 डिसेंबरला लुधियाना कोर्टातील दुसऱ्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये स्फोट झाला होता. त्या स्फोटात आयईडीचा वापर करण्यात आला होता. त्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता.टॉयलेटमध्ये बॉम्ब असेंम्बल करताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता.आयईडीचा वापर झाल्यानं पोलिसांना दहशतवादी हल्ल्याचा संशय होता.

दरम्यान लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात आलीय.जर्मनीत पोलिसांनी प्रतिबंध असलेल्या सिख फॉर जस्टिस संघटनेशी संबधित जसविंदर सिंह मुल्तानीला अटक केलीय. इतकचं नाहीतर जसविंदर सिंह हा दिल्ली आणि मुंबईमध्ये देखील दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होता. त्यासंदर्भात तो कट रच असल्याची माहिती आहे. या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.



नेमका कोण आहे जसविंदर सिंह मुल्तानी ?

जसविंदर सिंह मुल्तानी हा 45 वर्षांचा असून तो एसएफजेचे संस्थापक गुरपतवंत सिंह पन्नू यांचा निकटवर्तीय मानला जातो. जसविंदर सिंह याच्यावर फुटीरतावादी घटनांमध्ये सहभागी असल्याचा देखील आरोप आहे.

Mastermind arrested in Ludhiana court bombing case from Germany

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात