पिंपरी : उद्या चिंचवड गावात येणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स (CCS) यांनी याचे आयोजन केले आहे. Pimpri: Governor Keshiari will visit Chinchwad tomorrow


विशेष प्रतिनिधी

पुणे : चिंडवडमधील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे २९ व ३० डिसेंबरला ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ व्याख्यानमाला आणि ‘भारतीय वारसा : परिचय आणि संवर्धन’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे.दरम्यान या कार्यशाळेचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता याचे उद्घघाटन होईल.

चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स (CCS) यांनी याचे आयोजन केले आहे. याबाबतची संपूर्ण माहिती समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी सोमवारी दिली.त्याचप्रमाणे दोन्ही दिवस पारंपरिक कला आणि कौशल्यांचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी सहभागींना मिळणार आहे.



भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सर्व घटकांविषयीच्या शास्त्रीय नोंदी लोकसहभागातून जमा करून त्यांची सद्यःस्थिती नोंदविणारा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. यासाठीची पहिली कार्यशाळा ३० तारखेला होत आहे. यात डॉ. प्रमोद दंडवते, डॉ. श्रीकांत गणवीर, गिरीश प्रभुणे, प्रदीप रावत, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अरुणचंद्र पाठक, रमेश पडवळ आणि मयुरेश प्रभुणे मार्गदर्शन करणार आहेत.

Pimpri: Governor Keshiari will visit Chinchwad tomorrow

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात