पुणे : कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील १३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण


एमआयटी विद्यापीठाचे कुलसचिव प्रशांत दवे म्हणाले की , दोन-तीन दिवसांपूर्वी कोरोना बाधित अढळून आलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करत होते. Pune: 13 students of MIT World Peace University in Kothrud contracted corona


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील मॅकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षातील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

एमआयटीमधील विद्यार्थ्यांना कोरोना विषयक नियमांचे पालन करूनच प्रवेश देण्यात आला होता. तरीही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.परिणामी यामुळे पूर्ण कॅम्पस बंद करण्याचे कारण सध्या तरी समोर दिसत नाही.



एमआयटी विद्यापीठाचे कुलसचिव प्रशांत दवे म्हणाले की , दोन-तीन दिवसांपूर्वी कोरोना बाधित अढळून आलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करत होते. त्यांना विद्यापीठाच्या वर्कशॉपमध्ये स्पर्धेच्या तयारीसाठी प्रवेश दिला होता.दरम्यान एका कोरोना बाधित विद्यार्थ्याच्या संपर्कात २५ विद्यार्थी आले होते.त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातील १३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली.

दरम्यान त्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहेत.तसेच उरलेल्या आठ विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून चार विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही. महत्वाची बाब म्हणजे त्यात एकही विद्यार्थी ओमायक्रॉनचा नाही. त्यामुळेच कोरोना बाधित विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Pune : 13 students of MIT World Peace University in Kothrud contracted corona

महत्त्वाच्या बातम्या

Corona : कोरोनाचा वाढता आकडा – महाराष्ट्रात गेल्या २४ तासात सापडले १६०० नवे रुग्ण

WATCH : वेळ पडल्यास कठोर निर्बंध; लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा – भारती पवार

औरंगाबाद : धर्मवापसी ! ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदूधर्म स्विकारला-आणखी ६५ जणांची ‘धर्मवापसी’ होणार…

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात