विश्वविजयी फुटबॉल स्टार दिएगो मॅराडोना ह्यूबोल्ट घड्याळ आसाम मधून जप्त; वाजिद हुसेन या चोराला अटक


वृत्तसंस्था

गुवाहाटी : अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार दिएगो मॅराडोना याचे ह्युबोल्ट घड्याळ आसाम पोलिसांनी आज पहाटे जप्त केले. शिवसागर जिल्ह्यात कारवाई करून वाजिद हुसेन या चोराला अटक केली आहे. ही माहिती मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी ट्विट करून दिली आहे. Maradona hubolt watch recovered in Assam, thief wazid hussian arrested

मॅराडोनाचे घड्याळ चोरीला गेले होते. हे ऐतिहासिक घड्याळ त्याने वर्ल्डकप विजेत्या फुटबॉल सामन्यांमध्ये हातावर घातले होते. ते चोरीला गेल्यानंतर याबाबत दुबई पोलिसांनी चौकशी आणि तपास केल्यानंतर आसाम मधल्या व्यक्तीने ते चोरल्याचे स्पष्ट झाले. दुबई पोलिसांनी आसाम पोलिसांशी संपर्क केला संबंधित चोराविषयी माहिती कळवली. आज पहाटे शिवसागर मध्ये वाजिद हुसेन नावाच्या चोराला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ह्युबोल्ट हे घड्याळ जप्त केले. मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर त्या घड्याळाचा आणि हुसेन या चोराचा फोटो शेअर केला आहे.आसाम पोलिसांनी दुबई पोलिसांबरोबर समन्वय साधून ही महत्त्वाची कामगिरी पार पाडल्याबद्दल त्यांनी आसाम पोलिसांचे अभिनंदन केले आहे. मॅराडोना याने अर्जेंटिनाला दोनदा विश्वचषक फुटबॉल मध्ये विजय मिळवून दिला. अर्जेंटिनात त्याचे स्थान एखाद्या देवासारखे आहे. जगभरात त्याचे चाहते पसरले आहेत. त्यामुळे त्याने ऐतिहासिक विश्‍वचषक विजयी सामन्यात वापरलेले घड्याळ महत्त्वाचे आहे. ते चोरीला गेले होते आणि आसाम पोलिसांनी चोराला पकडून ते त्याच्याकडे जप्त केले आहे.

Maradona hubolt watch recovered in Assam, thief wazid hussian arrested

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण