औरंगाबाद : तलवारीने केक कापन पडलं महागात, बर्थडे बॉयला पोलिसांनी केली अटक


औरंगाबादमध्ये बावीस इंची धारदार तलवार घेऊन हर्षद रोहिदास गोरमे या तरुणाने जुना मोंढा परिसरामध्ये वाढदिवसाचा केक कापला होता. Aurangabad: Birthday boy arrested by police


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : लोक नवीन काय करतील याचा पत्ताच लागत नाही. आता एक नवीनच क्रेझ आली आहे,ती म्हणजे वाढदिवसासाठी तलवारीने केक कापणे. परंतु ही तलवारीने केक कापण्याची क्रेझ लोकांच्या चांगलीच अंगलट येते. अशीच एक घटना काल औरंगाबाद मध्ये घडली आहे.

औरंगाबादमध्ये बावीस इंची धारदार तलवार घेऊन हर्षद रोहिदास गोरमे या तरुणाने जुना मोंढा परिसरामध्ये वाढदिवसाचा केक कापला होता.त्याने तलवारीने केक कटिंग करतानाचा व्हिडीओ तरुणाने स्टेटसवर ठेवला होता.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. या प्रकरणी शस्त्रबंदी कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तलवारीने केक कापून बर्थडे सेलिब्रेट करणं तरुणाच्या अंगलट आलं आहे. हा सर्व प्रकार औरंगाबाद शहरातील जुना मोंढा परिसरात घडला.

Aurangabad : Birthday boy arrested by police

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय