कोरोनाचा कहर थांबविण्यासाठी लष्कराला मदतीला पाठवा – दिल्ली सरकारची आग्रही मागणी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आटोक्यात येत नसल्याने दिल्ली सरकारने आता कोरोना नियंत्रणासाठी भारतीय लष्कराची मदत मागितली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तशी विनंती करणारे पत्र संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना लिहिले आहे. Manish sisodia urged govt saying pl. send army for help

दिल्लीत कोरोनाचा प्रकोप विकोपाला गेल्याने लॉकडाउन आजपासून सलग तिसऱ्यांदा वाढवणे केजरीवाल सरकारला भाग पडले आहे. २ कोटी लोकसंख्येच्या दिल्लीत दररोज किमान २० हजार नवे रुग्ण आणि साडेतीनशे ते चारशेच्या घरात मृत्युमुखी पडणारे कोरोनाग्रस्त यामुळे दिल्ली बेहाल आहे. दिल्लीत आतापावेतो १६,९६६ लोकांचा मृत्यू झाला आहे.



संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत देशात सर्वाधिक बळी दिल्लीमध्ये गेले आहेत. रुग्णालयांमध्ये ऑक्सि्जनचा तुटवडा आणि औषधांची कमतरता यामुळे या भीषण संकटात दिल्लीकरांना वाली कोणीच नाही का, असे वातावरण आहे. केंद्राकडून दिल्लीला त्याचा हक्काचा ऑक्सिजनही दिला जात नसल्याची तक्रार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेकदा केली आहे आणि दिल्ली सरकारने तसे लेखी दिले आहे. उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला, ‘तुमच्या आवाक्यात येत नसेल तर कोरोना नियंत्रणाची सूत्रे सशस्त्र दलांना द्या’, अशी सूचना करून फटकारले होते. त्यानंतर सिसोदिया यांनी लष्कराची मदत पुरविण्याची विनंती केली आहे.

Manish sisodia urged govt saying pl. send army for help

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात