ममतांनी समाजवादी पक्षाच्या पराभवाचे खापर फोडले ईव्हीएमवर


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या पराभवाचे खापर फोडले ईव्हीएमवर फोडले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयाला यंत्राचा जनादेश असल्याचे म्हटले आहे. अखिलेश यादव यांचा बळजबरीने पराभव करण्यात आला आहे. सपा प्रमुखांनी या जनादेशाला आव्हान द्यावे. ईव्हीएमच्या फॉरेन्सिक तपासणीची मागणी त्यांनी केली आहे.Mamatasayss Samajwadi Party’s defeat is because of EVM

ममता बॅनर्जी म्हणाल्या, ईव्हीएमबाबत अनेक गोंधळ समोर आले आहेत. त्यामुळे वाराणसीच्या अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आले. समाजवादी पक्षाचा बळजबरीने पराभव केला आहे. हा लोकांचा जनादेश नसून यंत्रांचा जनादेश आहे. जर भाजपला असे वाटत असेल की, 2024च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणे एवढे सोपे जाईल, तर तसे अजिबात होणार नाही.



2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाच्या वक्तव्याबाबत ममता म्हणाल्या, दोन वर्षांनी काय होईल हे कोण सांगू शकेल? भाजपने केंद्रीय यंत्रणाचा वापर करून आणि हुकूमशाहीच्या माध्यमातून काही राज्ये जिंकली आहेत. ते 2024 देखील जिंकतील, या विचाराने खुश आहेत, परंतु हे एवढे सोपे असणार नाही.

चार राज्यांतील भाजपच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी आज हेही सांगेन की 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर काही राजकीय तज्ज्ञांनी सांगितले होते की, 2017 चे निकाल 2019 चे निकाल ठरवतील. मला विश्वास आहे की यावेळीदेखील ते 2022चे निकाल 2024 चा निकाल ठरवणार आहे.

Mamatasayss Samajwadi Party’s defeat is because of EVM

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात