विरोधकांच्या ऐक्याचे राजकीय ऐक्याचे ममतांचे प्रयत्न; विरोधी मुख्यमंत्र्यांच्या ऐक्याचे एम. के. स्टालिन यांचे प्रयत्न


वृत्तसंस्था

चेन्नई : एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्व विरोधकांचे राजकीय ऐक्य साधण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन देशातल्या भाजपविरोधी सर्व मुख्यमंत्र्यांचे ऐक्य साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्राची निवड केली आहे.Mamata’s efforts for political unity of the opposition; Opposition Chief Minister’s Unity M. K. Stalin’s efforts

एम. के. स्टालिन यांनी भाजपा सोडून अन्य 12 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये राज्यांची घटनात्मक स्वायत्तता टिकवण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. तामिळनाडूने केंद्र स्तरावरची वैद्यकीय प्रवेशाची नीट परीक्षा राज्यापुरती रद्दबादल ठरवली.त्यानंतर एम. के. स्टालिन यांनी त्याच्या पुढचे पाऊल उचलून महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, दिल्ली, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आदी बारा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शिक्षण क्षेत्रात राज्यांची घटनात्मक स्वायत्तता टिकवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

तिकडे ममता बॅनर्जी सर्व विरोधकांची राजकीय मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत यात काँग्रेस मोठा अडथळा ठरत आहे तर दुसरीकडे शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून एमके स्टालिन यांचा देखील तोच प्रयत्न दिसतो आहे. अर्थात स्टालिन यांच्या प्रयत्नांना सर्व राज्यांचे मुख्यमंत्री कशा स्वरूपाचा प्रतिसाद देतात यावर स्टालिन यांचे देशाच्या राजकारणातले महत्त्व नेमके किती आहे हे ठरणार आहे.

Mamata’s efforts for political unity of the opposition; Opposition Chief Minister’s Unity M. K. Stalin’s efforts

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण