ममतांचा निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा, भाजप म्हटले पराभवाच्या भीतीने अस्वस्थता वाढलीय


निवडणूक आयोगाचे (ईसी) तीन विशेष निरीक्षक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकऋ ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देत आहे. निवडणुकीनंतर अशा प्रकारच्या कारस्थानाविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी अस्वस्थ झाल्याने बेताल आरोप करत आहेत.Mamata warns Election Commission to appeal to Supreme Court, BJP says fears unrest


विशेष प्रतिनिधी

बोलपूर : निवडणूक आयोगाचे (ईसी) तीन विशेष निरीक्षक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकऋ ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देत आहे. निवडणुकीनंतर अशा प्रकारच्या कारस्थानाविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी अस्वस्थ झाल्याने बेताल आरोप करत आहेत.बीरभूम जिल्ह्यातील बोलपूरमधील सभेत त्या म्हणाल्या की,आयोगाचे हे निरीक्षक तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या आधीच्या रात्री ताब्यात घेण्याचे आदेश देत असून त्यांना सायंकाळी ४ वाजेपर्यंत कोठडीत ठेवले जात आहे,

व्हॉटसअपवरील याबाबतचे संभाषण भाजपमधील काही लोकांनीच आपल्याला दिले आहे. ममतांनी विशेष निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांशी केलेल्या संभाषणाची प्रत सादर केली.

यावर भाजपाचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी ममतांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, २ मे रोजी आपण सत्तेतून उखडले जाण्याची ममतांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्या बेताल झाल्या आहेत. वाट्टेल ते आरोप करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपा २०० हून अधिक जागा मिळवून सत्तेवर येणार आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपाला ७० जागाही मिळणार नाही. तर कॉँग्रेस- डाव्या आघाडी युतीला २० ते २५ पेक्षाही कमी जागा मिळतील. तृणमूल कॉँग्रेसला सत्तेवर येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

Mamata warns Election Commission to appeal to Supreme Court, BJP says fears unrest

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती