Malayalam Language Controversy : दिल्लीच्या जीबी पंत रुग्णालयाने नर्सिंग स्टाफला मल्याळम भाषेत बोलण्यास मनाई केली होती. परंतु देशभरातून तीव्र निषेध सुरू झाल्यावर रुग्णालय प्रशासनाला 24 तासांच्या आत हा आदेश मागे घ्यावा लागला. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी रुग्णालय प्रशासनास संबंधित आदेश मागे घेण्यास सांगितले आहे. दिल्ली सरकारच्या वतीने असा आदेश काढण्यासाठी जीबी पंत रुग्णालयाच्या एमएसला नोटीसही बजावण्यात आली आहे. malayalam language controversy delhi gb pant hospital withdraws order after Huge protest
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या जीबी पंत रुग्णालयाने नर्सिंग स्टाफला मल्याळम भाषेत बोलण्यास मनाई केली होती. परंतु देशभरातून तीव्र निषेध सुरू झाल्यावर रुग्णालय प्रशासनाला 24 तासांच्या आत हा आदेश मागे घ्यावा लागला. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी रुग्णालय प्रशासनास संबंधित आदेश मागे घेण्यास सांगितले आहे. दिल्ली सरकारच्या वतीने असा आदेश काढण्यासाठी जीबी पंत रुग्णालयाच्या एमएसला नोटीसही बजावण्यात आली आहे.
असा भेदभावाचा आदेश कसा काय देण्यात आला, अशी विचारणा करत जीबी पंत रुग्णालयाच्या एमएसला नोटीस बजावण्यात आली आहे. जीबी पंत रुग्णालयाने एक दिवसापूर्वी नर्सिंग स्टाफला संभाषणासाठी फक्त हिंदी किंवा इंग्रजी भाषाच वापरण्याचा आदेश काढला होता. या दोन भाषांव्यतिरिक्त अन्य कोणालाही दुसर्या भाषेत बोलताना आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता. यासंदर्भात जीबी पंत रुग्णालयाने परिपत्रक जारी केले होते.
रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त तक्रारीत असे सांगितले गेले की, नर्सिंग कर्मचारी त्यांच्या मातृभाषेत मल्याळम भाषेत बोलतात. यामुळे रुग्णांना त्यांचे म्हणणे समजण्यास अडचण होते, असे तक्रारकर्त्याने म्हटले होते. रुग्णालयातील नर्सिंग कर्मचार्यांनी परस्पर संभाषणासाठी मल्याळम भाषेचा वापर केल्याच्या तक्रारीवरून हिंदी किंवा इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषेच्या वापराविरुद्ध कारवाईचा इशारा रुग्णालयाने परिपत्रकाद्वारे काढला होता.
जीबी पंत रुग्णालयाच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. या प्रकरणाने राजकीय रूप धारण केले आणि बर्याच नेत्यांनी त्याचा उघडपणे विरोध केला. केरळमधील वायनाडचे खासदार आणि कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषेच्या आधारे हा भेदभाव असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, मल्याळम इतर भाषांइतकीच भारतीय भाषा आहे. तथापि, वाढता विरोध पाहून दिल्ली सरकारने रुग्णालयाला हा आदेश मागे घेण्यास सांगितले आहे.
malayalam language controversy delhi gb pant hospital withdraws order after Huge protest
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App