मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी पोटाला बॉँब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, अधिवेशन चालू देणार नसल्याचा नरेंद्र पाटील यांचा इशारा


मराठा आरक्षणासह इतर मागण्या ५ जुलैपर्यंत मान्य झाल्या नाही, तर आगामी पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही. वेळप्रसंग पडल्यास पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, पण मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही,असा इशारा माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिला.For Maratha reservation, if time come will put a bomb in the stomach and blow up the rest, Narendra Patil warns


प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणासह इतर मागण्या ५ जुलैपर्यंत मान्य झाल्या नाही, तर आगामी पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही. वेळप्रसंग पडल्यास पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू,

पण मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही,असा इशारा माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिला.मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच विविध मागण्यांसाठी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांनी त्याचे नेतृत्व केले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, तुमच्यासारखा जातीवंत माणूस आणि कट्टर मराठा आयुष्यात शांत बसणार नाही.

वेळप्रसंग पडल्यास पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, पण मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही.नरेंद्र पाटील म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात असल्याचे वेळोवेळी कृतीतून दिसून आलेले आहे.

स्व. अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी आत्मबलिदान दिल्यानंतर देखील हा प्रश्न आजपर्यंत कायम असून याला कारणीभूत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार आहे.

१९८२ साली अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी केली होती. तसेच त्यासाठी संघर्ष केला व आत्मबलिदान दिले. तरीदेखील काँग्रेस सरकारने काहीही पावले उचलेली नाहीत.

१९९९ साली मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरू केले. त्यानंतर सत्तांतर होताच आघाडी सरकारने ते बंद केले. २०१४ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मागणी पूर्ण करत आरक्षण टिकवण्यासाठी योग्य ती कारवाई केली.

सारथी व स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला. या योजनांना एक रुपयादेखील निधी महाविकास आघाडी सरकारने दिला नाही. आतापर्यंत मराठा समाजाचे एवढे मुख्यमंत्री झाले; परंतु त्यांनी मराठा समाजासाठी काहीही केले नाही.

विनायक मेटे म्हणाले, आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाले आहे. अशोक चव्हाण यांची आरक्षण समितीवरील निवड ही चुकीची असून त्यांनी समितीचा राजीनामा दिला पाहिजे. आघाडी सरकारने आरक्षणासाठी वरिष्ठ न्यायालयात अद्याप याचिका दाखल केलेली नाही, असे आ. मेटे म्हणाले.

For Maratha reservation, if time come will put a bomb in the stomach and blow up the rest, Narendra Patil warns

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण