उत्तर प्रदेशात बाराबंकीमध्ये भीषण रस्ता अपघात, बस-ट्रकच्या धडकेत 9 जण जागीच ठार, 27 जखमी


यूपीच्या बाराबंकीमध्ये गुरुवारी पहाटे एक भयंकर रस्ता अपघात झाला. येथे पर्यटक बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 27 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील 5 जणांना ट्रॉमा सेंटर लखनऊ येथे पाठवण्यात आले आहे. ही बस दिल्लीहून बहराईचकडे जात होती. Major Road accident in Barabanki Uttar Pradesh, bus and truck collide, 9 people dead


विशेष प्रतिनिधी

बाराबंकी : यूपीच्या बाराबंकीमध्ये गुरुवारी पहाटे एक भयंकर रस्ता अपघात झाला. येथे पर्यटक बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 27 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील 5 जणांना ट्रॉमा सेंटर लखनऊ येथे पाठवण्यात आले आहे. ही बस दिल्लीहून बहराईचकडे जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बस आणि ट्रक दोन्ही वेगात होते. मध्येच गुरे आल्यामुळे संतुलन बिघडले आणि दोन्ही वाहनांत धडक झाली. किसान पथ रिंगरोडवर हा अपघात झाला. घटनेनंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात हलवले.



नऊ जणांचा जागीच मृत्यू

हा अपघात बाराबंकीच्या देवा पोलीस स्टेशनजवळ बाबुरी गावाजवळ झाला. एक पर्यटक बस दिल्लीहून बहराइचकडे जात होती. तेवढ्यात समोरून एक ट्रक आला. ट्रक वाळूने भरलेला होता. त्याचवेळी बसमध्ये 70 जण प्रवास करत होते. बस आणि ट्रकमधील धडक इतकी भीषण होती की 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास, दिल्लीहून बहराइचकडे जाणारी पर्यटक बस देवा कोतवाली परिसरातील किसान मार्गावरील बाबूरी गावाजवळ पोहोचताच समोरून येणारा ट्रक अचानक अनियंत्रित झाला आणि धडकला. बसचे पत्रे कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, जेथे डॉक्टरांनी नऊ जणांना मृत घोषित केले.

Major Road accident in Barabanki Uttar Pradesh, bus and truck collide, 9 people dead

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात