अपघातातील जखमीला रुग्णालयात पोचविणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस; मोदी सरकारची घोषणा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रस्ते अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्यांना एका तासांत रुग्णालयात पोचविणाऱ्यांस पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. याबाबतची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे. Central government 5000 rupees will be given to the helper who takes the victims of road accident to the hospital

यासंदर्भात मंत्रालयाने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि परिवहन सचिवांना पत्र लिहिले आहे. यात, ही योजना १५ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू असेल, असे म्हंटले आहे. जखमींना प्रामाणिकपणे मदत करणाऱ्यांना बक्षीस देण्यासंदर्भात नियमावलीही प्रसिद्ध केली आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत, उपचार मिळावेत, हा योजनेचा महत्वाचा हेतू आहे.



रोख पुरस्कारासोबतच एक प्रमाणपत्रही

मदत करणाऱ्या व्यक्तीला रोख पुरस्कारासोबतच एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर या पुरस्काराशिवाय, राष्ट्रीय स्तरावर १० सर्वात प्रामाणिकपणे सहकार्य करणाऱ्यांना एक-एक लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात येणार आहे.

Central government 5000 rupees will be given to the helper who takes the victims of road accident to the hospital

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात