देशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात, शास्त्रीय पध्दतीने विल्हेवट लावण्यातही अद्याप नाही यश


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात तयार होत असून त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यातही अद्याप राज्याला यश आलेले नाही. विविध महानगर पालिकेत घनकचऱ्यावरील शास्त्रीय प्रक्रियेचे प्रमाण 18 वरून 70 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.Maharashtra, the largest waste creating center in the country, has not yet been successfully disposed of in a scientific manner

राज्यातील शहरी भागांमध्ये दररोज 22 हजार 401 मेट्रिक टन (एमटी) घनकचरा निर्माण होतो. यापैकी 20 हजार 609 मेट्रिक टन घन कचºयावर प्रक्रिया केली जाते. तर, 1 हजार 792 एमटी कचरा प्रक्रियेविनाच टाकला जातो.



प्रक्रियेविना टाकण्यात येणाºया कचºयाचे प्रमाण एकूण निर्माण कचऱ्याच्या तुलनेत कमी असले, तरी महारोगराईच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत राज्यात 100 टक्के घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे दिलेल्या माहितीनुसार, देशात दररोज 1 लाख 40 हजार 557 एमटी घनकचरा निर्माण होतो. यातील 98 हजार 324 एमटी घनकचऱ्यावर प्रक्रिया केले जाते तर 42 हजार 233 एमटी कचरा प्रक्रियेविनाच टाकला जातो.

मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रापाठोपाठ उत्तरप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा तसेच गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत घन कचरा व्यवस्थापनासाठी देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 6,375 कोटींहून अधिकच निधी देण्यात आला आहे.

या निधीचा उपयोग, कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प, साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, शोष खड्डे इत्यादी सुविधा उभारण्यासाठी केला जात असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. नुकत्याच 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत नागरी अभियान 2.0 मध्ये अभियानाच्या काळात मुख्यत: देशातील शहरांना कचरामुक्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

Maharashtra, the largest waste creating center in the country, has not yet been successfully disposed of in a scientific manner

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात