लव्ह जिहाद : आपल्या मुलींना जपण्यात पालकांची जबाबदारी मोठी!


प्रतिनिधी

पुणे : आफताब श्रद्धा लव्ह जिहाद केसमुळे हिंदू समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परंतु, त्याचबरोबर हिंदू मुलींची मानसिकता आणि त्यांच्या पालकांची भूमिका या विषयावर देखील सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर मंथन सुरू आहे. अनेक लेखक लेखिकांनी हिंदू मुलींची मानसिकता आणि पालकांची भूमिका यावर आपापल्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट केले आहेत विविध सामाजिक अभ्यासक अश्विनी टेंबे यांनी अशीच एक पोस्ट केली आहे. Love Jihad: Parents have a big responsibility to protect their daughters!

पालकांनो तिला जपा

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं नेहमीच सेम असतं. अशा भाबड्या कल्पनेत आपण असतोच. पण लव्ह जिहादचा एक भाग असलेले प्रेम हे मात्र सेम नाही, तर तो एक मोठा धार्मिक गेम आहे. षडयंत्र आहे. इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठीच काही धर्मांंध व्यक्ती, संस्था, संघटनांकडून योजलेले एक कारस्थान आहे. या फसव्या प्रेमाच्या जाळ्यात हिंदु मुली कशा अडकतात? त्यांचे धर्मांतर कसे केले जाते? एखादा मासा जाळ्यात अडकून तडपावा, त्याप्रमाणे या मुली धर्मांतरानंतर वा लग्नानंतर कशा तडफडत जगतात? यातून हजारो हिंदू कुटुंबे कशी पूर्णपणे उध्वस्त होत आहेत? या संकटापासून हिंदू मुलींना कसे वाचवता येईल? यासाठी तुम्ही आम्ही काय करु शकतो हे सगळे सांगण्यासाठीच हा संवाद आहे.

हिंदूंनों समजून घ्या.

दुदैवाने धर्माबाबत आज समाजात, विचारवंतांमध्ये, सोशल मिडियात, विविध संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी चुकीची समीकरणे तयार झाली आहेत, की कोणी मुस्लीम वा ख्रिश्चनांना नाही तर त्यांच्या धर्मांध वागण्याला थोडा विरोध केला, तर तो विरोध करणारा, त्याबद्दल बोलणारा लगेच जातीयवादी, मुस्लीमविरोधी, ख्रिश्चनविरोधी ठरवला जातो. त्याचप्रमाणे हिंदूंमधीलही अंधश्रद्धांना कोणी विरोध केला, की धर्माच्या तथाकथित ठेकेदारांकडून त्याला हिंदू समाजाचा शत्रू ठरवला जातो.थेट धर्मद्रोही ठरवला जातो. मूळ समस्येकडे न बघता समस्येंवरील भाष्यावरुन लगेच त्या व्यक्तीचे वर्गीकरण करायची आम्हाला घाई असते. आता या समस्येंकडे पाहण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी गटात सामिल व्हावेच लागते असे नाही. डावे उजवेच व्हावे लागते, असेही नाही पण जे चुकीचे आहे त्याला चुकीचे म्हणण्याइतका किमान तटस्थपणा तरी आपल्याजवळ आहे का? अल्पसंख्य शद्भाभोवती उगाचच सहानुभूतीचे वलय तयार करायचे अन त्यांच्या धर्मांध कारवाया झाकून ठेवायच्या. हे किती दिवस चालणार?

भारतीयांची राज्यघटना लोकसंख्येच्या बळावर किंवा मतांच्या धमकीवर आज वा उद्या विशिष्ट धर्मावर आधारित होवू नये, ती कायम धर्मनिरपेक्षच रहावी यासाठी आपण कायमच सावध राहिले पाहिजे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन कुणीही असोत, बाबांनो तुमचे धर्मग्रंथ वंदनीय, पूजनीय आहेत. पण आज ते अनुकरणीय नाहीत. त्यांचे स्थान हृदयात नसून वाचनालयाच्या कपाटात आहे. व्यवहारात विज्ञान आणि मानवता हीच एक कसोटी आहे. भारतात हिंदूंना हिंदू म्हणून राहण्याचा पूणं अधिकार आहें.

लव्ह जिहाद नक्की काय आहे?

साधारणपणे लव्ह जिहाद या संकल्पनेचा अर्थ लव्ह फॉर जिहाद किंवा जिहाद थ्रू मीन्स ऑफ लव्ह अर्थात फसव्या प्रेमातून धर्मांतराचा जिहाद असा आहे. खरे तर गैरमुस्लिमांना मुस्लीम धर्मात आणणे, या अनेक वर्षे चालू असलेल्या अनेक प्रकारच्या प्रयत्नांपैकी लव्ह जिहाद फक्त एक नवीन प्रकारचा प्रयत्न आहे.

या संकल्पनतील प्रेमाचा अर्थ स्पष्ट करुन सांगायची गरज नाही, पण जिहाद या नवीन असलेल्या संकल्पनेचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे. जिहाद हा शद्ब अरबी जुहद या शद्बापासून आला आहे. त्याचा अरेबिक शाद्बीक अर्थ प्रयत्न करणे, संघर्ष करणे हा आहे. इस्लामिक परिभाषेत त्याचा अर्थ अल्लाहच्या कार्यासाठी प्रयत्न करणे हा अहे. जिहाद हा व्यापक आणि सर्वसमोशक शद्ब असून त्यात गैरमुस्लिमांविरुद्ध लढणे, स्वत:च्या दोषांविरुद्ध संघर्ष करणे, वाणीने किंवा शस्त्राने संघर्ष करणे, भौतिक आणि आंतरिक संघर्ष करणे अशा गोष्टी येतात. इथे प्रयत्न आणि संघर्ष हे शद्ब फार महत्वाचे आहेत. ते मुस्लिमांसाठी एक युद्ध आहे. जगात कुठेही नजर फिरवली तरी तुमच्या लक्षात येईल की जिथे मुस्लिमांची ताकद अधिक आहे, त्यांचे संख्याबळ जास्त आहे, तिथे इस्लामिक राजवटीसाठी उघड उघड संघर्ष केला जातो. आक्रमक हिंसक मार्गाचा जिहाद केला जातो. त्याचे मार्ग पुढीलप्रमाणे

त्यांच्या तुलनेत कमी असलेल्या गैरमुस्लिमांना जबरदस्तीने मुस्लीम व्हायला भाग पाडणे. यसाठी त्यांना मृत्युचे भय दाखवले जाते. त्यांना इस्लामिक प्रदेशातून हाकलून दिले जाते, जसे की काश्मीर खोर्‍यातून 3 लाख हिंदूंचे उच्चाटन करण्यात आले.

त्यांना शासन करणे. त्यांची घरे, जमिनी, संपत्ती, व्यवसाय, मालमत्ता काबिज करणे दहशत पसरवण्यासाठी त्यांचे हत्याकांड घडवून आणणे, त्या भीतीच्या जोरावर त्यांचे धर्मांतर करुन घेणे.

त्यांच्याकडून जिझिया कर वसुल करणे (इस्लामिक राज्यात गैरमुस्लिमांनी द्यावयाचा कर.) त्याचप्रमाणे गैरमुस्लिमांना दुय्यम नागरीक म्हणून वागवत अगदी प्राथमिक संधीही नाकारणे असेही अनेक मार्ग वापरले आहेत. (आजही पाकिस्तानात शिखांकडून ते केवळ गैरमुस्लिम आहेत म्हणून तालिबानी अतिरेकी जिझिया कर वसुल करतात)लव्ह जिहाद मधला धर्मांतराचा डाव

आज भारतात व भारतबाहेरही हिंदू, शिख, बौद्ध समजातल्या विद्यार्थींनीपासून ते विवाहित महिलांपर्यंत आणि महाविद्‌‌‌यलयांपासून ऑफिसपर्यंत सर्व ठिकाणी हा फसव्या प्रमातून धर्मांतराचा डाव खेळला जातो. संसाराची स्वप्ने दाखवून हिंदू मुलींना जाळ्यात ओढायचं. सर्व शपथा, वचन देवून त्यंना इस्लाम कबूल करायला लावायचा. त्यांचे धर्मांतरण करायचे. आणि त्यांच्याशी विवाह किंवा पुर्नीविवाह करायचा. एकदा का ती मुस्लीम झाली की, त्यानंतर तिला कोणत्याही प्रकारच्या दहशवादाच्या वा गुन्हेगारी कामात सामील करुन घ्यायचे. तसे नाही झाले तर तलाकची धमकी देवून तिच्या असाहयतेचा फायदा घेत दहशतीने कोणतीही कामे करुन घ्यायची. किंवा तिचे लैंगिक शोषण करुन तीन चार मुले पैदाह करुन घ्यायची. नंतर तिला वार्‍यावर सोडून द्यायचे. नाहीतर दुय्यम बायको बनवून ठेवायचे. नाहीतरी मुलीला रितसर सोडचिठ्ठी देण्याच्या बदल्यात मुलींच्या आईवडलांकडून भक्कम पैसे उकळायचे.

जेव्हा मुली पळून जातात

कोणालाही कळू न देता आपली मुलगी अचानक पळून जाते, त्यानंतर घरात आणि नातवाईकांमध्ये मोठा गहजब होतो. तिच्यावर सगळेच संताप करायला लागतात. घराची अब्रू घालवली, आता समाजात काय तोंड दाखवणार? लोक काय म्हणतील? इत्यादी इत्यदी. ती आजपासून माझ्यासाठी मेली असे टोकाचे बोलायलाही पालक कमी करत नाहीत. हे बरोबर नाही.

कशी असावी पालकांची भूमिका

मुलगी एका परधर्मीयाबरोबर पळून गेली. अशावेळी पालकांनो सबुरीने घ्या. लोक, समाज बोलतच राहणार. त्यांच्याही आधी तुम्ही तुमच्या मुलीचा विचार करा. समाज किंवा लोक अशा नाजूक प्रसंगी मुलगी परत आणण्यासाठी करण्याचे उपाय आणि त्यासाठीची कृती यामध्ये किती सहभाग घेतात. याचा अंदाज घ्या. अशा मंडळींना लांबच ठेवा.

पालकांनो…. एक लक्षात घ्या. मुलगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवली गेलेली असते. ती एका कटकारस्थानाला बळी पडलेली असते. त्यात आपल्या मुलीचा दोष असेलही पण तिला धर्मांतरासाठी फसवणार्‍यांचा दोष जास्त आहे. हे सर्वप्रथम स्विकारा. माझी पोटची मुलगी मी इतक्या सहजासहजी जावू देणार नाही, असा पक्का निग्रह करा. मुलीच्या नावाने बोट मोडत बसू नका. ते सर्वात सोपे आहे. ते कोणीही करेल. मात्र आपल्याला झालेल्या घटनेला समर्थपणे सामोरे जाण्याचे अवघड काम करायचे आहे.

लक्षात घ्या, मुस्लीम जिहादीबरोबर पळून जाण्याचा तिचा निर्णय हा एका दिवसात झालेला नसतो. तेव्हा तिच्यावर रागवताना पालक म्हणॅून आपण कुठे कमी पडलो याचाही विचार करा. देव, देश, धर्माचे त्याहून सर्वात म्हत्वाचे म्हणजे आपल्या इतिहासाचे आपण मुलीर काय सर्ंस्ंकार केले, तिच्याशी त्या विषयावर कधी सेंवाद साधला, याचाही विचार करा.

ती कोणाबराबेर पळून गेली असेल याचा दाट संशय असेल किंवा कोणबाबात संशय असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध थेट उच्च न्यायालयात हेबइस कॉर्पस या अधिकारांतर्गत त्वरीत याचिका दाखल करा. त्या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्याचा आदेश माननीय कोर्ट पोलसांना देते व त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होतो व पुढील कार्यवाहीस मदत होते.

सर्वात म्हत्वाचे म्हणजे पहिले काही दिवस ती व तो लव्ह जिहादी लपून छपून इकडेतिकडे राहात असतात. कुठे कुठे प्रवास करतात. अशा वेळी मुलाची खरी लायकी व खरे रंग मुलींना कळायला लागतात. यादरम्यान पश्चातापाने जर ती पुन्हा घरच्या लोकांशी संपर्क साधायचा प्रयत्न करत असेल तर अशावेळी फोनवरच तिच्यावर राग काढला जातो. इथेच आपली चूक घडते. तिच्या मनात परत येण्याचा विचार सुरु असतो, पण घरचे आता आपल्याला स्वीकारणार नाहीत या भितीपोटी ती घरी परतत नाही. त्यामुळे नाइलाजाने तीं त्याच्याबरोबरच फिरत राहते.

मुलगी पुन्हा घरी आल्यानंतर तिचे योग्य ते समुपदेशन केल्यानंतर ती तच्यिा आयुष्यात स्थिर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे परत येत असलेल्या मुलीला दूर लोटू नका. यावरुन तुमच्यात किती पुरुषार्थ आहे ते कळेल. शांतपणे तिचे मन वळवण्यात, तिला प्रेमाने स्वीकारण्यात खरा अर्थ आहे.

अश्विनी टेंबे

(लेखिका विविध सामाजिक विषयांच्या अभ्यासक आहेत.)

Love Jihad: Parents have a big responsibility to protect their daughters!

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण