विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील पोलिसांच्या परवानगीनंतरच धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार आहे. Loudspeakers at religious places only after police permission
यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज डीजीपी आणि पोलिस आयुक्तांची बैठक घेणार आहेत. यासंदर्भात ते मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील, असे मानले जात आहे. याशिवाय ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठक घेणार आहेत.
ठाकरेंनी दिला होता अल्टिमेटम
महाराष्ट्रात सध्या लाऊडस्पीकरचा वाद रंगला आहे. मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्यासाठी मनसेकडून सातत्याने आंदोलन सुरू आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील सभेत भाषण करताना मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली होती. ३ मे पर्यंत राज्य सरकारने या प्रश्नावर कारवाई न केल्यास मशिदीबाहेर ध्वनीक्षेपक लावून हनुमान चालीसा पूर्ण आवाजात वाजवू, असा इशारा त्यांनी दिला होता. तेव्हापासून राज्यात जातीय तणाव निर्माण होण्याची भीती अधिक गडद होत आहे.
पीएफआयने केली होती निदर्शने
राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर पीएफआयनेही निदर्शने केली. यावेळी पीएफआय मुंब्राचे अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी यांनी रॅलीला संबोधित करताना प्रक्षोभक भाषण केले. ‘तुम्ही एका लाऊडस्पीकरलाही स्पर्श केलात तर PFI सर्वात पुढे दिसेल’, असे ते म्हणाले होते. यादरम्यान शेखानी यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात निदर्शनेही केली. देशात मुस्लीम दडपले जात असल्याचा दावा करत त्यांनी काही लोकांना मुंब्य्रातील वातावरण बिघडवायचे असल्याचे सांगितले. तुम्ही आम्हाला छेडले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दिला होता.
भडकाऊ भाषणानंतर मुंबई पोलिसांनी शेखानीवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, तेव्हापासून तो फरार आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, मतीन शेखानीच्या अटकेसाठी दोन पथके तयार करण्यात आली असून, पोलीस त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. बेकायदेशीर सार्वजनिक सभा आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App