विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. काही झालं की देवबाप्पाकडे गाऱ्हाणं मांडणाऱ्या या चिमुकल्यांनी आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच आपली समस्या मांडली आहे. Letter to PM CM: Because of the letter, our teeth are not coming; Chief Minister Hemant Biswa Sarma’s reply to Chimukalya; Said ..
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4140505636075756&id=100003490811658&sfnsn=wiwspmo
ही समस्यासुद्धा अशी की जी वाचून आपल्याला हसू येतं. पण या चिमुकल्यांचा निरागसपणा, त्यांचा क्युटनेस काळजाला भिडतो. या चिमुकल्यांनी चक्क आपल्याला दात येत नाहीत (Assam kids letter about teeth), यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं (Assam Siblings Letter to PM Naendra modi). या पत्राला आता मुुख्यमंत्र्यांचे उत्तर आले आहे.
आसाममधील दोन चिमुकल्यांचं पत्र (Assam Siblings Letter) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी आपली दातांची समस्या मांडली आहे. सोशल मीडियावर चांगलेच शेअर होत असलेल्या या पत्रावर अखेर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांचं उत्तर आलं आहे. 6 वर्षांची रईसा रावजा अहमद आणि 5 वर्षांचा आर्यन अहमद. या दोन्ही भावंडांचे दात पडले आहेत. त्यांचे समोरील दात पडले आहेत.
प्रिय मोदी जी… माझे दात येत नाही आहेत.यामुळे मला जेवताना त्रास होत आहे. कृपया आवश्यक ती कारवाई करावी’, असं या पत्रात म्हटलं आहे. सोबतच या पत्रावर दातांचं छोटंसं चित्रही काढण्यात आलं आहे. या मुलांचं हे पत्र त्यांचे काका मुख्तार अहमद यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलं आहे.
I’ll be happy to arrange a good dentist in Guwahati for you so that we can enjoy your favourite food together. https://t.co/feeSJFsBg7 — Himanta Biswa Sarma (Modi Ka Parivar) (@himantabiswa) September 29, 2021
I’ll be happy to arrange a good dentist in Guwahati for you so that we can enjoy your favourite food together. https://t.co/feeSJFsBg7
— Himanta Biswa Sarma (Modi Ka Parivar) (@himantabiswa) September 29, 2021
हिमंत बिस्वा सरमा यांनी सहा वर्षांच्या रईसा रावजा अहमद आणि पाच वर्षीय आर्यन अहमद यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर दिले आहे. त्यांनी त्यांचे उत्तर ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विटही चांगलेच व्हायरल झाले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी ट्विट केले, ‘तुमच्यासाठी गुवाहाटीमध्ये चांगल्या दंतवैद्याची व्यवस्था करण्यात मला आनंद होईल. जेणेकरून आपण एकत्र तुमच्या आवडत्या जेवणाचा आनंद घेऊ शकू.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App