प्रतिनिधी
मुंबई : लतादीदींच्या जाण्याने संपूर्ण भारतवर्षावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जगभरातून लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात येत असून, स्वर्गीय सूर अखेर शांत झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी विविध काव्यपंक्ती द्वारे लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. latamangeshkar passed away update
संगीत विश्वातील अनेक दिग्गजांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुमन कल्याणपूर यांनीही लतादीदींशी अत्यंत जवळचे नाते असून त्यांच्या जाण्याचे दु:ख कायम मनात राहील अशा भावना व्यक्त केल्या आहेत. संगीत दिग्दर्शक आणि बहुमुखी-बहुभाषी कलाकार ए. आर. रहमान यांनी शोक व्यक्त केला. ट्विटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना रहमान म्हणाले, “लता मंगेशकर जी यांना आदर…प्रेम आणि प्रार्थना” आम्हांला बर्याच गोष्टी शिकवणाऱ्या महान व्यक्तिमत्वाला माझी श्रद्धांजली असे ट्वीट रहमान यांनी केले आहे. तसेच सोशल मिडियावर व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.
Lata Mangeshkar : कोल्हापुरातील याच घरात गेलं लतादीदींचं बालपण, मंगेशकर कुटुंबीय १० वर्षे राहिले
श्रेया घोषाल, उदीत नारायण, सुदेस भोसले यांनी स्वरसम्राज्ञी लता दीदींचा आवाज दैवी आहे. स्वरसम्राज्ञी लतादीदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत.
आज सरस्वती विसर्जनाच्या दिवशी आपल्या माता सरस्वती आपल्यातून नाहीशा झाल्या. त्यांच्या आवाजातून कायम त्या आपल्यासोबत असतील असे ट्विट करत सुरेश वाडकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडूनी दोन्ही करा”, अशा भा. रा. तांबे यांच्या काव्यपंक्तीद्वारे गायिका वैशाली सामंत यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App