Lata Mangeshkar : कोल्हापुरातील याच घरात गेलं लतादीदींचं बालपण, मंगेशकर कुटुंबीय १० वर्षे राहिले


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींनादेखील उजाळा मिळालाय. मंगेशकर कुटुंबीय कोल्हापुरात दहा वर्षे भाड्याच्या घरात राहण्यासाठी होतं. कोल्हापुरातील लक्ष्मण कारेकर यांच्या घरी अवघ्या दहा रुपयांच्या किरायावर हे मंगेशकर कुटुंबीय राहत होतं.Lata Mangeshkar Lata’s childhood was spent in this house in Kolhapur, Mangeshkar family stayed for 10 years


प्रतिनिधी

कोल्हापूर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींनादेखील उजाळा मिळालाय. मंगेशकर कुटुंबीय कोल्हापुरात दहा वर्षे भाड्याच्या घरात राहण्यासाठी होतं. कोल्हापुरातील लक्ष्मण कारेकर यांच्या घरी अवघ्या दहा रुपयांच्या किरायावर हे मंगेशकर कुटुंबीय राहत होतं.

तीन खोल्यांच्या या छोटेखानी भाड्याच्या घरात लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर या भावंडांचे बालपण गेलं. त्या वेळी आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबीयांना कारेकर कुटुंबीयांनी वेळोवेळी मदतही केली होती. आज लतादीदींच्या निधनाची बातमी आल्यानंतर कारेकर कुटुंबीयांनी दीदींसोबतच आपल्या आठवणी ताज्या केल्या.



आरएनओ या वृत्तसंस्थेने कारेकर कुटुंबीयांना बोलतं केलं. यावेळी कल्पना कारेकर तसेच लक्ष्मण कारेकर यांनी लतादीदींच्या आठवणी जागवल्या. लहानपणी लतादीदी कशा होत्या, त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी होती याबाबत त्यांनी माहिती दिली. अर्जुन नलावडे यांनी सांगितले की, कोल्हापुरात आल्यावर लतादीदींची जयप्रभात स्टुडिओला हमखास भेट असायची. त्या अतिशय मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. त्यांच्या अनेक आठवणी कोल्हापूरशी जोडलेल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

Lata Mangeshkar Lata’s childhood was spent in this house in Kolhapur, Mangeshkar family stayed for 10 years

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात