Laptop Blast in Delhi Court : दिल्लीतील रोहिणी कोर्टात लॅपटॉपचा स्फोट, कामकाज स्थगित, पोलिसांनी सुरू केला तपास


दिल्लीतील रोहिणी कोर्टात गुरुवारी सकाळी स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना सकाळी 10.40 वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. स्फोटानंतर न्यायालयातील कामकाज स्थगित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. Laptop blast in Rohini Court in Delhi, work suspended, police start investigation


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी कोर्टात गुरुवारी सकाळी स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना सकाळी 10.40 वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. स्फोटानंतर न्यायालयातील कामकाज स्थगित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅगेत लॅपटॉपसोबत टिफिन होता. टिफिनचा स्फोट होण्याचीही शक्यता आहे. अँटी टेरर युनिटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे, “जोपर्यंत बीडीएस आणि एफएसएल तज्ज्ञ याचा तपास करत नाहीत, तोपर्यंत हा स्फोट कसा झाला आणि तो कोणत्या प्रकारचा होता हे सांगता येणार नाही.”



एक जण जखमी

स्फोटामुळे रोहिणी बार कौन्सिलमध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. राजीव असे जखमी जवानाचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरात छर्रे घुसल्याचे सांगण्यात येत आहे.

Laptop blast in Rohini Court in Delhi, work suspended, police start investigation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात