CDS Rawat Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करणार एअर मार्शल मानवेंद्र सिंग, जाणून घ्या त्यांच्याबद्दल..


देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे निधन झाले आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी दुपारी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. CDS Rawat Helicopter Crash Know About Air Marshal Manvendra Singh who will investigate the Coonoor chopper accident


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे निधन झाले आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी दुपारी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला.

देशाच्या सर्वात मोठ्या लष्करी अधिकाऱ्याच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात आहे. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत या घटनेची माहिती देताना सांगितले की, या घटनेचा तपास एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ते म्हणाले, की तपास पथकाने कालच कुन्नूर येथे पोहोचून आपले काम सुरू केले आहे.

कोण आहेत एअर मार्शल मानवेंद्र सिंह?

एअर मार्शल मानवेंद्र सिंग सीडीएस बिपिन रावत हेलिकॉप्टर अपघाताच्या त्रि-सेवा चौकशीचे नेतृत्व करतील. मानवेंद्र सिंग हे भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडर आहेत आणि ते स्वतः हेलिकॉप्टर पायलट आहेत. एअर मार्शल सिंग 29 डिसेंबर 1982 रोजी हेलिकॉप्टर पायलट म्हणून भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रँचमध्ये सामील झाले. त्यांनी याच वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रयागराजमध्ये केंद्रीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता.


Bipin Rawat Helicopter Crash : सीडीएस रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, पाहा घटनास्थळाचे मन सुन्न टाकणारे फोटो


2019 च्या सुरुवातीला एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांनी हवाई मुख्यालयात महासंचालक (निरीक्षण आणि सुरक्षा) पदाची सूत्रे स्वीकारली. आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत मार्शल यांनी अनेक प्रकारची हेलिकॉप्टर उडवली आहेत. मानवेंद्र सिंग यांना 6600 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी सियाचीन, ईशान्य उत्तराखंड, वेस्टर्न डेजर्ट आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्येही उड्डाण केलेले आहे.

CDS Rawat Helicopter Crash Know About Air Marshal Manvendra Singh who will investigate the Coonoor chopper accident

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात