Omicron : राज्यातील पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाला डिस्चार्ज, पण आणखी १० जणांची भर, महाराष्ट्रात आता २० आणि देशात ३३ ओमिक्रॉन बाधित


महाराष्ट्रात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या या ३३ वर्षीय रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, राज्यात एकाच दिवशी आणखी 10 ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. 10 more Omicron infected patients were found in Maharashtra, 20 in the state and 33 in the country


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या या ३३ वर्षीय रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, राज्यात एकाच दिवशी आणखी 10 ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या यामुळे २० वर गेली आहे. देशातही आता ओमिक्रॉन वेरिएंटची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टापेक्षा पाच पट जास्त संसर्गजन्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आणखी अहवालांची प्रतीक्षा

बुधवारी राज्यातील ओमिक्रॉनच्या संसर्गाबाबत माहिती देताना टोपे म्हणाले, “आज महाराष्ट्रात एकूण 10 ओमिक्रॉन प्रकाराची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. सुमारे ६५ स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचाही अहवाल येणे बाकी आहे. आमच्याकडे तीन जीनोम सिक्वेन्सिंग लॅब आहेत. येत्या काळात नागपूर आणि औरंगाबाद येथेही प्रयोगशाळा सुरू करणार आहोत.

दरम्यान, महाराष्ट्रात ओमिक्रॉन संसर्गाची २० प्रकरणे आहेत. राजस्थानमध्ये 9 प्रकरणे आहेत. कर्नाटकात 2 ओमिक्रॉनची प्रकरणे आढळून आली आहेत. गुजरातमध्ये 1 ओमिक्रॉन संसर्गाचा रुग्ण आढळला आहे. याशिवाय देशाची राजधानी दिल्लीत 1 ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण आढळून आला आहे.

10 more Omicron infected patients were found in Maharashtra, 20 in the state and 33 in the country

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात